सर्वात वर

अभिनेत्री प्राची देसाईने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

मुंबई – ‘कसम से’ या मालिकेतून २००६ मध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai)ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.प्राचीने ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.प्राचीने ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘अजहर’, ‘लाइफ पार्टनर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे प्राचीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला कास्टिंग काउचचा आलेला एक भयानक अनुभव सांगितला आहे.

कास्टिंग काउचचा अनुभव फक्त प्राचीला (Prachi Desai) नाही तर आता पर्यंत अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनी आला आहे. या अभिनेता आणि अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव उघडपणे सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अकिंता लोखंडेनेही तिला आलेले कास्टिंग काउचचे दोन अनुभव सांगितले होते.

याबाबत ‘बॉलिवूड बबल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ” मला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यासाठी दिग्दर्शकाने मला कॉम्प्रोमाईज करायला सांगितले होते. मी नकार दिला त्यानंतर दिग्दर्शकाने मला फोन केला आणि पुन्हा या बद्दल बोलला. मी त्याला सांगितले मला तुझा चित्रपट करायचा नाही,” असे प्राची म्हणाली. प्राची आज लोकप्रिय अभिनेत्रीं पैकी एक असली तरी सुद्धा तिला करीअरच्या सुरूवातीला कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे.