सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड २४

टेलिव्हिजन जाहिराती (Advertising World)

सोबत रेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग),  निवेदिका – किशोरी कुलकर्णी

टेलिव्हिजन वरील जाहिरातीत अभिनेता विजय गोखले आणि विजय पाटकर 

निवेदिका- आज आपण माहिती घेऊयात इलेक्ट्रॉनिक मीडियामधल्या टेलिव्हिजनविषयी अर्थात दूरदर्शनविषयी; तर नंदनजी सुरुवातीला या माध्यमाविषयी काय सांगाल?

नंदनजी– टेलिव्हिजन म्हणजे दृक आणि श्राव्य यांचं मिश्रण. म्हणजेच काय तर दृश्य आणि श्रवण. जे आपण करतो असं एकत्रित गारूड जे माणसाच्या मनावर जास्त प्रमाणात आणि जास्त काळ टिकून राहातं आणि म्हणूनच टेलिव्हिजनच्या जाहिरातींचं (Advertising World)एक वेगळं महत्त्व आपल्याला दिसून येतं. एखादं उत्पादन किंवा सर्व्हिस आपण जिवंत स्वरूपात लोकांसमोर मांडू शकतो आणि याचा वेगळा परिणाम लोकांच्या मनावर जास्त काळ टिकून राहातो.

निवेदिका- आणि आपण नेहमीच म्हणतो की, कानांनी जे आपण ऐकतो त्यापेक्षा डोळ्यांनी बघतो त्याचा आपल्या मेंदूवर एक ठसा उमटतो आणि मला वाटतं याचाच फायदा टेलिव्हिजन या माध्यमाला मिळत असेल.

नंदनजी– हो, कानांनी ऐकतो आणि डोळ्यांनी पाहातो हा एकत्रित परिणाम जास्त काळ टिकून राहातो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, या माध्यमाचा वापर करताना जे मॉडेल्स वापरतो त्याच्या चेहर्‍यावरचे भावभावना व्यक्त करतात. याचबरोबर याच्या हालचाली या सगळ्याचा एकत्रितपणे जर वापर केला गेला तर आपलं उत्पादन हे जास्त चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी या माध्यमाचा वापर केला जातो किंवा उपयोग होतो.

निवेदिका- आणि टेलिव्हिजनच्या माध्यमाचा वापर करून जेव्हा जाहिरात (Advertising World)केली जाते तेव्हा एक प्रकारे एक छोटीशी कथाच काही सेकंदात त्या दर्शकासमोर मांडलेली असते आणि म्हणूनच त्या सगळ्याचा परिणाम दर्शकाच्या मनावर होतो आणि त्या उत्पादनाकडे तो आकृष्ट होतो. मग जसं तुम्ही म्हणालात की, टेलिव्हिजन हे दृक-श्राव्य माध्यम आहे, तर प्रिंट मीडिया किंवा रेडिओ या माध्यमांबरोबर तुलना करताना टेलिव्हिजनचं काय महत्त्व आहे ?

नंदनजी- चांगला प्रश्न आहे. वर्तमानपत्र हे ज्याला वाचता येतं त्यालाच फक्त समजतं. यासाठी सुशिक्षित माणूस लागतो, तर ते वाचनीय माध्यम आहे. त्याचं त्या ठिकाणी महत्त्व आहेच. ते वेगळं आहे. रेडिओ हा जर आपण बघितला तर ते फक्त कानांनी ऐकता येतं. तेही माध्यम त्याच्या ठिकाणी चांगलं आहे. त्याच्या ठिकाणी त्याचं वेगळं महत्त्व आहे; पण दूरदर्शन किंवा टेलिव्हिजनच्या जाहिराती जर आपण बघायला गेलं तर दृश्य, आवाज म्हणजे श्रवण, संगीत आणि समोर असणारे शब्द या चार गोष्टींचा एकत्रित परिणाम किंवा एकत्रित सादरीकरण जर झालं तर त्याचा प्रभाव जास्त चांगल्या प्रकारे दर्शकावर होतो.

निवेदिका- जाहिरातींच्या सर्व माध्यमांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर टेलिव्हिजन हे अत्याधुनिक माध्यम आहे आणि रोज नवनवीन काही प्रयोग त्यात होत असतात, संशोधन होत असतात आणि तेवढी प्रगती होत असते, याबद्दल काय सांगाल?

नंदनजी– टेलिव्हिजन हे माध्यम जे आहे ते जास्त प्रसिद्ध माध्यम आहे. आताचा बदललेल्या टेक्नॉलॉजीमुळे हाय डेफिनेशन किंवा अगदी अलीकडचं 4 k रिझॉल्युशनच्या जाहिराती जर आपण आपल्याकडे तसे संच असतील तर त्या माध्यमात बनलेल्या जाहिराती अतिशय प्रसिद्ध जाहिराती आपल्याला बघायला मिळतात.

निवेदिका- आणि भव्यदिव्य असं काहीतरी दिसत असतं.

नंदनजी- बरोबर. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे संगीताचे परिणाम आपण ऐकू शकतो आणि हे दृश्य स्वरूप आणि संगीताचा परिणाम याचा एक वेगळा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणून या जाहिरातींनी वेगळी उंची गाठलेली आहे, टेक्नॉलॉजीची उंची गाठलेली आहे, दृश्य स्वरूपाची उंची गाठलेली आहे, संगीताच्या परिणामाची उंची गाठलेली आहे. त्याचा परिणाम फार वेगळ्या पद्धतीने आपल्यावर होतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, हे माध्यम जसं प्रसिद्ध आहे याचा एक वेगळा विचार जाहिरात एजन्सी नेहमी करत असतात. माणसाचा एक स्वभावधर्म आहे की कनिष्ठ मध्यम वर्गातला जो माणूस आहे, हा मध्यम वर्गाच्या लोकांची स्वप्न पाहात असतो. तिथे जायचा प्रवास करत असतो. त्याचप्रमाणे मध्यम वर्गाचा माणूस उच्च मध्यम वर्गाचा प्रवास करत असतो किंवा तिथली स्वप्नं बघत असतो किंवा त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. कनिष्ठ मध्यम वर्गाच्या माणसाला या जाहिराती नेहमी मध्यमवर्गीयाकडे आकृष्ट करत असतो. मध्यमवर्गाच्या माणसाला उच्च मध्यमवर्गीयांकडे जाण्यासाठी आकृष्ठ करत असतात, तर हा जो प्रवास आहे हा करण्यासाठी टेलिव्हिजन माध्यमाची मदत होऊ शकते. तिथे एक वेगळंच जग(Advertising World) निर्माण केलेलं असतं. ती स्वप्ननगरी या सगळ्या ग्राहकांना आकर्षित करत असते आणि म्हणून जर आपण आज आढावा घेतला, तर असं लक्षात येतं की, बर्‍याच राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत या इतर माध्यमांपेक्षा, इतर मीडियापेक्षा टेलिव्हिजन माध्यमासाठी जास्त फंड रिझर्व्ह ठेवतात. सगळ्यात जास्त बजेट या माध्यमासाठी ठेवलं जातं; कारण याचे परिणाम जास्त प्रमाणात होतात. या जाहिरातींमुळे त्यांना जास्त फायदापण मिळत असतो.

निवेदिका- म्हणजे थोडक्यात टेलिव्हिजन माध्यमाचा वापर करून जाहिराती केल्या, तर त्याचा निकाल नक्कीच जास्त मिळत असतो.

नंदनजी- किशोरी तसं बघायला गेलं तर या माध्यमाचे सगळ्यात जास्त फायदे आहेत. संध्याकाळी माणूस जेव्हा निवांत होतो, कुटुंब रिलॅक्स होते आणि मग टीव्ही बघायला, मनोरंजनाचे कार्यक्रम बघायला बसतात त्यावेळेला ते निवांतपणे आपल्या प्रॉडक्टची जाहिरात बघत असतात. हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. त्यानंतर काही चॅनेल्स असे आहेत ज्यांचं टेलिकास्टिंग हे नुसतं भारतात होत नाही तर भारताच्या बाहेर होतं. त्यामुळे तिकडच्या भारतीय नागरिकांनासुद्धा आपलं प्रॉडक्ट त्याच पैशामध्ये बघायला मिळतं. सर्वसामान्य एखाद्या उत्पादनाची जाहिरात जेव्हा आपण टेलिव्हिजनवर बघतो त्यावेळेला आपोआप त्याची इमेज वाढते. लोकांना असं वाटतं की, अरे हे फार भारी प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्टबद्दल आपलेपणासुद्धा निर्माण होतो; कारण रोज आपण ते प्रॉडक्ट जवळून बघतो. आपलंस वाटल्यामुळे पटकन त्या प्रॉडक्टच्या जवळ जाऊन ते खरेदी करायला भाग पडतो.

निवेदिका- म्हणजे ग्राहक आकर्षित होण्यामध्ये टेलिव्हिजनचा खूप मोठा हात आहे.

नंदनजी- हो. प्रॉडक्ट जवळून त्याचे क्लोज-अप वगैरे असल्यामुळे ते जवळून हाताळायला मिळाल्यासारखं आपण बघतो. अशा पद्धतीने या माध्यमाचे बरेच फायदे आहेत.

निवेदिका- आणि फक्त मनोरंजनाचे कार्यक्रमच नाहीत, तर न्यूजसुद्धा रोजच्या दोन बघितल्या जातात. त्या बातम्यांच्या चॅनल्सवर जर आपण जाहिराती दिल्या तर त्याचाही एक वेगळा फायदा किंवा एक वेगळा प्रभाव ग्राहकांवर नक्कीच पडत असतो.

नंदनजी- आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय असते की, एका भाषेमध्ये आपण जाहिरात तयार केली, तर तोच व्हिडिओ ठेवून आपण वेगवेगळ्या प्रांतातल्या जाहिरातींना आपण ऑडिओ देऊ शकतो. तोही एक वेगळा फायदा उत्पादनाच्या दृष्टीने आपल्याला मिळू शकतो.

निवेदिका- नंदनजी, आज तुम्ही माहिती देत आहात. इलेक्ट्रॉनिक मीडियामधल्या टेलिव्हिजनविषयी! तुम्ही म्हणालात की, टेलिव्हिजन हे माध्यम दृक-श्राव्य माध्यम आहे. याविषयी एखादा किस्सा…

नंदनजी- नक्कीच सांगता येईल. पूर्वीच्या काळी टेक्नॉलॉजी ज्यावेळी सुधारलेली नव्हती त्यावेळी एक जाहिरात करतानाचा अनुभव आहे. फूट रिफ्लॅक्टर नावाचं प्रॉडक्ट होतं. या प्रॉडक्टमध्ये गरम पाणी टाकून त्याला सप्लाय दिला तर त्या व्हायब्रेशनमुळे आपण जेव्हा थकून-भागून माणूस घरी येतो आणि अर्धा तास टीव्ही बघताना त्यात पाय बुडवून बसतो आणि त्याच्या त्या रक्ताभिसरणाने थकवा निघून जातो, असं ते प्रॉडक्ट होतं तर याची जाहिरात शूट करत असताना मॉडेल येऊन बसतो आणि असिस्टंट दिग्दर्शकाने सांगितलं की, त्यामध्ये पाणी आणून टाका, तर प्रॉडक्शनच्या माणसाने त्यात नॉर्मल पाणी आणून टाकलं गार. त्याला सांगितलं की गार नाही गरम पाणी हवंय. गरम पाणी दिसूच शकत नाही, गार काय आणि गरम काय, त्यामुळे काय फरत पडतो. म्हटलं नाही इथे गरम पाणीच पाहिजे. त्यावेळी थोडीशी त्या ठिकाणी चेष्टामस्करी झाली. मी म्हटलं की, गरम पाणी टाकलं तर त्यांच्या वाफा दिसतात आणि त्याचा परिणाम जो आहे; म्हणजे दृक-श्राव्य माध्यम आपण वापरतोय, तर त्या ठिकाणी पाणी दिसेल; पण गरम पाणी दिसणार नाही. मग गरम पाण्यामध्ये वाफा दिसून येतात. आजच्या टेक्नॉलॉजीच्या वापरात गार पाणी टाकलं असतं तर चाललं असतं; कारण वाफा आपण संगणक ग्राफिक्सने दाखवू शकतो; पण इथे वाफा दिसल्या पाहिजेत. म्हणून दृक-श्राव्याचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल याचा कल आमचा त्यावेळी होता. त्यातून हा किस्सा घडला.

पुढचा विषय – टेलिव्हिजन जाहीराती                                                                                                                                                                                                                     

(क्रमश:)

jahirat VIshwa

टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही (Advertising World) लेखमाला जनस्थानच्या वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.

वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com