सर्वात वर

जाहिरात विश्व – एपिसोड २०

इलेक्ट्रॉनिक मिडिया  / रेडिओ जाहिराती प्रसिद्धी

लेखाच्या सोबतरेडियो प्रोगामची ऑडियो लिंक दिली आहे.

तज्ज्ञ – जयेश पाटील (स्टेशन हेड, रेडियो मिरची) आणि नंदन दीक्षित (संचालक, निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंग)

निवेदिका –  जयेशजी गेली पाच वर्षं तुम्ही रेडिओ या माध्यमात काम करत आहात. सेल्स, मार्केटिंग, टेक्निकल, प्रॉडक्शन अशी कितीतरी डिपार्टमेंटस् तुम्ही सांभाळली आहेत; तर एकूण या माध्यमाविषयी सांगाल का?

जयेशजी- रेडिओमध्ये अनेक प्रकार आहेत. शॉर्ट वेव्ह, मीडिअम वेव्ह आणि एफएम चॅनल या माध्यमात एफएमची संकल्पना अशी आहे की, 40 कि.मी.चा डायमीटर तुमच्या शहरापासून कव्हर करावा, हे सरकारचे धोरण आहे. जेणेकरून रेडिओ हे माध्यम सर्वतोपरी शहराच्या जवळची जी गावं आहेत, तिथपर्यंत पोहोचावं. हे माध्यम पॅसिव्ह मीडियम आहे. सर्वात स्वस्त, सहजासहजी तुम्ही ऐकू शकता. मीडियाच्या जगतात आजही तो तुम्हाला फ्रीमध्ये करमणूक करतो हे महत्त्वाचं.

निवेदिका –   नंदनजी तुम्ही गेली 25 वर्षे एका अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक म्हणून काम करता. रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे; ज्याचा वापर तुम्हीही करत आहात. तुम्ही काय सांगाल?

नंदनजी – रेडिओ हे खरे तर सर्पोर्टिंग माध्यम आहे; पण तो इतका प्रभावी आहे; मी उदाहरण देऊ शकतो की, आम्ही तर आमच्या ग्राहकाकडे अशा पद्धतीने बघतो की, एखादी जाहिरात करतोय; समजा माझ्याच 4 ग्राहकाच्या जाहिराती आहेत. त्या विशिष्ट टाईम-स्लॉटमध्ये लावायच्या आहेत, तर त्या प्रत्येक जाहिरातीचं वेगळेपण कसं जपावं लागतं आणि ते जपणं कसं गरजेचं आहे, हा आम्ही विचार करतो. या पद्धतीने या जाहिराती तयार करतो. दुसरी गोष्ट म्हणजे बिल्डर असेल, तर त्याची स्टाईल वेगळी ठेवावी लागते, ज्वेलरी असेल, तर त्याच्या सौंदर्याशी संबंध असतो. त्याच्या जाहिराती वेगळ्या, कपड्याचं दुकान असेल तर त्याच्या जाहिराती वेगळ्या स्टाईलने बनवाव्या लागतात. ग्राहकाचा ग्राहक कोण आहे, टार्गेट कोण आहे, त्याला काय भावेल, हा विचार करून जेव्हा आपण जाहिराती करतो त्याचा नक्कीच आपल्या ग्राहकाला फायदा होतो.

जयेशजी – या मुद्याला थोडे पुढे जाऊन बोलायला गेले तर रेडिओ माध्यम हे इन्फॉरमेटिव्ह आहे. माहिती देण्याचं सर्वात उत्तम माध्यम आहे. इर्मजन्सी सर्व्हिस किंवा दररोज मला लागणारी योग्य वेळ सांगणे असेल किंवा ट्रॅफिक अडचण सांगणे असेल किंवा आरोग्य, खेळ अशा विषयांची माहिती असेल, तर माहितीचं स्वरूप म्हणून रेडिओ उत्कृष्ट माध्यम आहे. या माध्यमात प्रभावी होण्याचा मूलमंत्र, जेवढी उत्तम माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवाल तितकी लोकं तुम्हाला जोडली जातील.

नंदनजी- मला आणखी एक सांगायचंय, रेडिओ हे माध्यम ऐकण्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागत नाही. टेलिव्हिजनसमोर बसावं लागतं. वर्तमानपत्र वाचायला घ्यावं लागतं; पण रेडिओ चालू आहे आणि आपण आपलं काम करतोय. आकाशवाणीचे जे विविधभारतीचे कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये असे अनेकदा ऐकतो. त्याच्यामध्ये हॅलो फर्माईश किंवा हे जे काय येतात त्यांना ती लोकं त्यांच्या व्यवसायाचा एक अविभाज्य घटक म्हणून त्यांच्याकडे पाहातात आणि ते ऐकत असताना त्याचं काम चालू असतं. आता आणखीन नवीन चॅनल्स आले आहेत, तर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या वयानुसार आणि आवडीनुसार ते ते चॅनल्स ऐकत असतो.

जयेशजी- रेडिओ माध्यमांचा जर कोणी जाणीवपूर्वक विचार केला असेल, तर आपल्या पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केलेला आहे. आजच्या डिजिटल जगात प्रत्येक नवीन येणारा व्यावसायिक, सरकारच्या नवीन योजना डिजिटल माध्यमात येतात, ते चालू असताना दरवेळी जेव्हा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रेडिओवर होतो. त्याचं कारण आज रेडिओचा रिच, लोकांपर्यंतची पोहोच ते रेडिओ सोडून सद्य स्थितीत कोणाकडेही नाही. त्यामुळे रेडिओ माध्यम सगळ्यात स्वस्त, उपयोगी, सहजासहजी पोहोचू शकणारं माध्यम आहे.

निवेदिका –   म्हणून आपण त्याला प्रभावी माध्यम म्हणतो. आज खूप लोकल चॅनल्स आले आहेत, एफएम आलेले आहेत; पण जागतिक स्तरावर पण रेडिओ चॅनल्स खूप लोकप्रिय आहेत. आवडीने ऐकली जातात. एकूण त्याविषयी काय म्हणाल?

जयेशजी – नाशिकमध्ये सध्या दोन एफएम चॅनल, एक आकाशवाणी आहे आणि एक कम्युनिटी रेडिओ आहे. मी म्हणेन हे काहीच नाहीए. जो रेडिओचा देश आहे तो अमेरिका म्हणेन. मी स्वत: ट्रॅव्हल केलं तेव्हा पाहिलं की लॉस एंजेलिस, लास वेगासमध्ये 26 ते 27 चॅनल एका एका शहरात ऑपरेट करतात. त्यामुळे रेडिओ किती पसरू शकतो, त्याची किती मर्यादा आहे, हे त्या देशाने ऑलरेडी दाखवलंय. भारतात याची सुरुवात झाली आहे. फेज तीनमुळे त्याची एक पुढची दिशा आलेली आहे. छोट्या छोट्या शहरात जाणार आहे. फेज तीनचे धोरणच असे आहे की, ज्या ज्या शहरांमध्ये एक लाख लोकसंख्या आहे, त्या शहरांमध्ये एक नवीन एफएम चॅनल तुम्ही ओपन करू शकता.

निवेदिका –   जर याच माध्यमाचा वापर करून जर जाहिरात केली, तर त्याचे काय  फायदे होऊ शकतील?
जयेशजी – रेडिओची जाहिरात ही अत्यंत क्रिएटिव्ह आहे. आवाजाच्या स्वरूपात तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचंय. हे तसं पाहिलं तर लिमिटेशन आहे; पण या लिमिटेशनची ताकद करून अनेक लोकांनी याचा सुंदर वापर केला आहे. अनेक क्रिएटिव्ह एजन्सीजनी स्वत:चे क्रिएटिव्ह थॉट्स त्यात टाकून लोकांना जास्तीत जास्त कसं, एखादा प्रोजेक्ट, एखादं प्रॉडक्ट त्यांच्यासमोर लाईव्ह कसं करता येईल, याचं प्रयोजन फक्त आवाजाद्वारे करणं ही फार मोठी क्रिएटिव्ह गोष्ट आहे.

निवेदिका –   रेडिओ हे एकमेव माध्यम सर्वतोदूर पोहोचतंय, खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचतं, तर याच्यातून जाहिरात केल्यावर उद्योजकांना काय फायदा होऊ शकेल?

जयेशजी – कार्यक्रमांची संकल्पना सकाळची वेगळी आहे, दुपारची वेगळी आहे आणि संध्याकाळची वेगळी आहे. याचा बेस तुमचं मूड बिएव्हअर आहे. सकाळी तुम्ही तयार होत असता, फ्रेश माईंड असतं. त्यावेळी गाण्यांची चाहूल लागली तर मनाला अजून छान वाटतं. 11-12 नंतर मी माझ्या कामात गुंततो, गृहिणी आपल्या कामात गुंततात, त्यावेळेस वेगळा मूड तयार होतो. दुपारचं जेवण, विश्रांती याला वेगळा मूड असतो. संध्याकाळी काम संपतं. वेगळी गडबड असते, घरी येणं, स्वयंपाक करणं, लहान मुलांना खेळून परत येणं हा सर्वांच्या परतीचा प्रवास सुरू होतो त्यावेळी त्या पद्धतीची गाणी असतात. त्यावेळी जेव्हा त्याच्याबरोबर एखादी जाहिरात कंबाईन होते, जाहिरात अ‍ॅक्च्युली कॉम्प्लिमेंटरी होते; पण ती मनाच्या कोपर्‍यात मोठं घर करते. या सुंदर गाण्याबरोबर ही जाहिरात मी ऐकली होती हे एक रसायन आहे. या रसायनात एखादी जाहिरात अ‍ॅड करतो म्हणून ती लोकांना जास्त आवडते. लोक कोणतेही माध्यम जाहिरात म्हणून ऐकायला जात नाहीत. तसंच रेडिओला पण आहे.

निवेदिका –   नंदनजी अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीचं याबाबतीत काय रोल आहे?

नंदनजी- एजन्सीचा फार महत्त्वाचा रोल असतो. जसा आपला फॅमिली डॉक्टर असतो, त्याला आपल्या सगळ्या मेंबर्सच्या आरोग्याबाबत सगळं माहीत असतं तसं एजन्सी त्या ग्राहकाच्या सगळ्या माध्यमांवरती काम करत असते. त्यांचे यूएसपीज् माहीत असतात. त्यांचे फ्युचर प्रोजेक्टस माहीत असतात आणि हे एजन्सीशी चर्चा केल्यानंतरच पुढे पुढे जात असतो. त्यामुळे एजन्सीला वर्तमानपत्र, मॅग्झिन, होर्डिंग, रेडिओ, टेलिव्हिजन सगळ्या माध्यमांचा, ग्राहकाचा अभ्यास करून , मीडिया प्लॅन बनवून त्याला एक युनिफॉरमिटी जपावी लागते. जी प्रेस जाहिरात असेल, त्यात जे मॉडेल असेल, जे डिझाईन असेल तो फॉरमॅट त्याला टेलिव्हिजनला वापरावा लागतो. टेलिव्हिजनमधल्या ऑडिओला रिलेटेड आणि त्या स्क्रीप्टला रिलेटेड स्क्रीप्ट रेडिओला वापरावी लागते. प्रेस जाहिरातीचं डिझाईन होर्डिंग जाहिरातवर कसं येईल, तर याच्यात ते थोडे चेंजेस करून ते करत असतात आणि जर ती युनिफॉरमिटी आली तरच ग्राहकाला त्याचा फायदा का होतो? तर त्याला ते सगळीकडे पाहिल्यावर कळतं की याचं हे प्रॉडक्ट आहे. सगळ्याच अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये प्रॉडक्शन होत नाही, कोणी फक्त प्रेस जाहिरातमध्ये काम करतं, कोणी फक्त अजून काही; पण ग्राहक मात्र ते करून घेतो. रेडिओच्या जाहिराती करताना त्या त्या पर्टिक्युलर प्रॉडक्शन हाऊसमध्ये येतं तेव्हा ते सगळं पाहून घेतात, की तुमचं होर्डिंग डिझाईन कसं आहे, टीव्ही जाहिरात कशी आहे, तुमचं वर्तमानपत्रातलं डिझाईन कसं आहे, त्याच्याप्रमाणे हे प्रॉडक्शन हाऊस कामं करतात. त्याचा इफेक्ट खूप चांगला होतो आणि ग्राहकाला त्याचा फायदा मिळणं जास्त महत्त्वाचं असतं.

निवेदिका –  फारच सुंदर माहिती आज जायेशजी आणि नंदनजी तुमच्याकडून मिळाली, एकूणच रेडियो हे फक्त श्राव्य मध्यम असूनही अतिशय प्रभावी माध्यम आहे असे आज आमच्या सर्व श्रोत्यांना नक्कीच समजले असेल.
तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा धन्यवाद ! 

 (क्रमशः)

पुढचा विषय – जाहीरातीसाठीचे जिंगल लेखन 

jahirat VIshwa

(टिप – सदर लेख हा मूळ श्राव्य माध्यमातला असून रेडियो मालिकेद्वारे प्रसारित करण्यात आला होता.या मालिकेचे पुढे पुस्तकरूप शब्दमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले असून ही लेखमाला जनस्थानच्या  वाचकांसाठी खास लिखित आणि श्राव्य माध्यम स्वरुपात सादर करीत केली जात आहे.)वाचकांसाठी संपर्क – नंदन दीक्षित – ९४२२२ ४७२६१  Website – www.nirmitiadvertising.com