सर्वात वर

राज्यभरातील दुकाने उघडण्या संदर्भात व्यापारी संघटनांची सायंकाळी महत्वाची बैठक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर चे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक 

नाशिक – कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पहिले लॉक डाऊन (Lock Down) करण्यात आले. त्यानंतर कालांतराने सगळे व्यवहार पुन्हा सुरु झाले.व्यापाऱ्यांचे व्यवसाय आता कुठेतरी रुळावर आले होते. परंतु काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा उद्रेक करण्यास सुरु केली.त्यामुळे ब्रेक द चेन करून पुन्हा कड़क निर्बंध लावण्यात आले.  

आता पुन्हा लॉकडाउन का (Lock Down) ? पुढे काय ? याबाबत चर्चा करण्यासाठी  राज्यभरातील दुकाने उघडण्याबाबत व्यापारी संघटनांची महत्वाची बैठक ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर तर्फे’ (Trade Associations)आज दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र चेंबर चे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली  ६.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वांनी ऑनलाईन बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी प्रभारी सहकार्यवाह सागर नागरे यांनी केले आहे. (Trade Associations)