सर्वात वर

चला हवा येऊ द्या च्या मंचावर अनिता दाते ची एन्ट्री

स्वप्नील जोशी च्या पत्रवाचनाने अनेकांचे डोळे पाणावले.

मुंबई- देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली.लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका,सिनेमांच्याचित्रिकरणार पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे.त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील (Zee Marathi) मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं, सध्या चला हवा येऊ द्याचं (Chala Hava Yeu Daya) शूट जयपूर मध्ये सुरु आहे.

ह्याच हवा च्या मंचावर आता नवीन एन्ट्री होणार आहे ती म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम आणि राधिका मसाले ची सर्वेसर्वा ‘अनिता दाते’ हिची,अनिता आता हवा च्या हास्यवीरांसोबत विनोद करताना दिसणारआहे.

Swapnil Joshi -Chala Hva Yeu dya

तसेच हवा येऊ द्या च्या ह्या आठवड्यातील वैशिष्ट्य म्हणजे ‘स्वप्नील जोशीने’ वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन आणि राजकारणावर भाष्य करणारे पत्र वाचन केलं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.तेव्हा हसता हसता डोळ्यात पाणी आणणारे .’चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Daya) चे हे भाग ३ मे ते ५ मे रोजी झी मराठीवर (Zee Marathi) रसिकांना पाहायला मिळणार आहे.