सर्वात वर

लसीकरणा आधी होणार अँटीजेन टेस्ट !

नाशिक –  नाशिक महानगरपालिकेतर्फे  ३१ लसीकरण केंद्र सुरु आहे.लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये.त्यासाठी लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची अँटीजेन टेस्ट (Antigen Test) करून घेणे आता गरजेचे ठरणार आहे.जेणे करून कोणी नागरिक त्याठिकाणी सुपर स्प्रेडर असल्यास कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रावर आल्यास त्यांनी अँटीजेन टेस्ट करून लस घ्यावी व नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासना तर्फे करण्यात येत आहे. 

  मिशन झिरो व मिशन लसीकरण अतंर्गत नाशिक महानगरपालिका,भारतीय जैन संघटना,वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स  यांच्या संयुक्त विद्यमाने  नाशिक शहरात अँटीजेन टेस्ट(Antigen Test) केंद्र सुरू करण्यात आले आहे.