सर्वात वर

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अडकली विवाह बंधनात

विवाह सोहळ्याचे फोटो फेसबुकवर केले शेअर 

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी अखेर विवाह बंधनात अडकली आहे. या विवाह सोहळ्याचे फोटो सोनालीने आपल्या फेसबुकवर शेअर करत पोस्ट लिहली आहे.

आपल्या पोस्ट मध्ये सोनाली लिहिते 
आम्ही जून मध्ये uk ला  लग्न करणार होतो कारण त्याची पूर्ण family&friends तिथे असतात. पण तिथल्या 2ndwave मुळे तारीख पुढे करावी लागली. जुलै मधली तारीख ठरली.लग्नाच्या तयारीसाठी मी मार्च मध्ये shooting संपवून दुबईला आले आणि भारतात 2ndwave आली. 

Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण..लग्न बंधनात ही! April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला.

July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही, Quarantine, travel restrictions, family साठी risk, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकार चे नियम,याचा विचार करता आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ कॅन्सल  करायचा निर्णय घेतला.

जून चं जुलै होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी जुलै चं मे  मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही.जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’.

आपल्या देशात अशी परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही. तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाहीआई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो.माझं कुटुंब भारतात, कुणाल चं लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही.आता Registration करून टाकू २ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी,१५ मिनी. मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात(इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू(लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) करून Marriage Certificate वर sign केलं 

सोनालीच्या साखरपुढ्याचे फोटो पाहिल्यानंतर सोनाली लग्न कधी करते अशी तिच्या चाहत्यांना प्रतीक्षा होती अखेर चाहत्यांना त्याचे उत्तर मिळाले सर्वांची लाडकी अप्सरा विवाह बंधनात अडकली.सोनाली च्या लग्नाची बातमी समजल्यावर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.