सर्वात वर

व्यक्ती तितक्या प्रवृती…

पल्लवी पटवर्धन

आता तर एकच शांतता आहे आत आणि बाहेरही..

एकांतात बसलो कि ज्या गोष्टींना आपण समर्पित होऊ शकतो… त्यात आपण समरस होतो 

माझी स्पेस मी सतत जपत आलीये … रोजच्या रूटीनवर्क मध्ये ठरलेली काम झाली कि मी कोषात जायचे ठरवते… का कुणास ठाऊक मी अनेक आवाजांपासुन स्वत:ला लांब ठेवत आलीये म्हणजे जिथे पोहचायचं तिथे मी पोहचतेच कधीकधी खुप आवाज येत असतात पण आत पोहचत नाही त्यामुळे माझी तंद्री लागते आणि  एकाग्रतेची किल्ली सापडते … काही जण मला reserve म्हणाले असतील किंवा ही स्वत:तच जगत असते असंही म्हणाले असतील  पण एका ठराविक वेळा नंतर माझा स्वतंत्र कप्पा मला सतत बोलवतो  तो बोलवतो तेव्हा मी त्यात जास्त रमते … कारण माझा स्वभाव भडाभडा बोलण्यातला नाही बरेचदा असं वाटतं मी बोलुन कोणाला दुखावत तर नाही ना मग नकोच बोलुया मग पुढच्या मागच्या गोष्टींची सरमिसळ होऊन वादाचा जन्म होतो त्यापेक्षा नकोच अनावश्याक गोष्टींना मनाच्या दारातुनच चालते व्हा म्हणायचं… नाहीतर उगाच guilt घेऊन का जगा …त्यापेक्षा स्वत:तच व्यक्त व्हावं लेखणीच्या माध्यमातून … कारण बरेचदा आपण मुक्त बोलतो ते पोहचत नाही अनेकांपर्यंत … आणि लिखाणातुन प्रत्येकजण म्हणजे वाचक स्वत:शी रिलेट करतो…

प्रत्येकाला ते आपलं वाटतं असतं..लिहीतंना आपल्या प्रवासात अनेक व्यक्तीसह वल्ली डोळ्यासमोर उभ्या रहातात मग यांचे स्वभाव म्हणजे विचारता सोय नाही मग यांत आपली निरीक्षण क्षमता कायम कामाला येते … काही जण तर अक्षरशा त्यांच्या कामापुरता आपल्याशी जोडलेले असतात… काहींना खरच काहीएक घेणंदेणं नसतं आपण त्यांच्यासाठी काय केलयं याच्याशी…तर काहीजण उगाचच आपल्या आयुष्यात लुडबुड करत असतात… माणसाला काही स्वस्थ बसवत नाही …आणि स्वस्थ माणसांना अस्वस्थ माणसं काही सोडत नाही… खरतर हिच गंमत आहे आयुष्यात समतोल रहायला ज्याला जमतं तोच सगळीकडे तग धरू शकतो… 

गृहीत धरणं तर इतकं सोप्प झालयं आजकाल म्हणजे आपलं मत न एैकताच अनेकांनी आपलं मतं नमुद केलेलं असतं.. कधी न व्यक्त होण्याचे तोटे ही सहन करावे लागतातच कि माणसाला.आदरयुक्त भितीने ही आपण नाहीच बोलत मग त्याबद्दलही गैरसमज.. काहीजण तर अर्धवट एैकुन रिअॅक्ट होतात रोजच्या बोलण्यात pause work no allowed तो फक्त नाटकात चालतो इथे घेतला तर प्रकरण अंगाशी येतं…..अहो (सर , भाऊ , काका, ताई , मॅडम)… माझं वाक्य संपलेलं नव्हतं हो तिथे स्वल्पविराम होता … पुर्णविराम आला कि सोडतो ना मोठा श्वास हे असं सांगावं लागतं… प्रत्येकाला वाटतं आपलं समोरच्यानं एैकुन घ्यावं पण आपल्याही वाटतं असतं आपल्याला कधी संधी मिळेल बोलायची तर नाहीच ना… तर हे महाशय हातातला माईक सोडतील तर मिळेल ना संधी.. गंमत असते माणसाने listener असायलं हवं म्हणजे हे गोंधळच होणार नाही… फोनवर बोलतांना अश्या गमती तर नेहमीच घडतात , समोरचा माणूस Hello म्हणुन इतका मोठा pause घेतो कि इकडच्याला वाटतं कि बहुदा फोन कट झालाय म्हणुन तो कट करुन ठेवुन देतो मग तो पुन्हा फोन करतो… काहीजण आपण फोन केला तरी तीन शब्द बोलुन फोन कट करतात जसं आपलं फोनचं बिल त्यांना भरावं लागणार होतं गंमत आहे ना…

काही जणांचा फोन तास झाला तरी संपत नाही खरचं काय बोलत असतील हा ही एक गहन मुद्दा आहे…खरतरं एकच गोष्ट अनेकदा सांगतात …पण त्यांना आपल्याला सांगुन काय कौतुक करुन घ्यायचे असते त्याचं त्यांना कळलं तरी बस्स…काही गोष्टी इतक्या रटाळ असतात आपण कितीदा सांगितले तरी लोक त्यांच्या आवडत्या मुद्द्यांवर येऊन घसरतातच मग आपण फक्त डोळ्यांच्या बाहुल्या स्तब्ध ठेवायच्या आणि म्हणायचं मनातल्या मनात चालु द्या चालु द्या तुमचं माझीच निवड केलीये ना हे सगळं एैकण्यासाठी… काही जणांची Energy save होत असते याने…. कदाचित त्यांचा  ऊर्जास्त्रोत तोच असावा… अनंत स्वभावातुन अनंत जीव विखुरलेले असतात… आपण जे नाही आहोत ते सतत सांगुन पटवुन देण्याचा भलता अट्टाहास असतो राव… अरे तुम्ही सांगत फिरतात का मी अशी आहे किंवा मी असा आहे ..रहा ना शांत पण नाही स्वभावाला औषध नाही…

जग इकडचे तिकडे होवो पण हे त्याच्या तर्कवितर्कातुन अनेक गोष्टी तयार करतात आणि आपल्याला एैकवतात कारण श्रोते आपणच ना… मी अभिनय क्षेत्रात असल्याने मला हे खुपच उपयोगात पडतयं कारण कोणत्या वेळी कोणतं पात्र निभावावं लागेल याचा नेम नसतो कारण आम्ही तर हेच शिकतो आधी निरीक्षण करणे…न वाचलेल्या अनुभवाच्या  पुस्तकातुन याची गंमत कळते… खरतरं हे मनुष्य स्विकारतच पुढे जात असतो… काहींना खुप त्रास होतो..काही अती त्रास करवुन घेतात … काही सोडुन देतात.. मला तर धरून ठेवावं लागत कारण मी यांतुन स्वत:ला शोधते …. ते म्हंटलयं ना  जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृती….

पल्लवी पटवर्धन