सर्वात वर

कुळीथाचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र – ३)

डॉ राहुल रमेश चौधरी 

कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Ayurvedic Medicine Plant) आहे.तसेच एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथामधे भरपूर प्रमाणात लोह असते.बाजारात कुळीथ फार कमी ठिकाणीच उपलब्ध असते.

त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या बाजारात सोयाबीनची मागणी वाढल्याने बहुतांश शेतकरी सोयाबीनची लागवड करण्यास पसंती देतात.तसेच कुळीथाची लागवड केल्यास एखाद्यावेळेस पीक काढण्यास उशीर झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, त्यामुळे पिकाचे नुकसान होते.यापिकाची लागवड केल्यापासून पीक येण्यासाठी जवळपास तीन महिने म्हणजे ९० दिवसाचा कालावधी लागतो. कुळथाचे आरोग्यास (Ayurvedic Medicine Plant) काय फायदे आहेत ते जाणून घेऊ या 

आरोग्यासाठी (Ayurvedic Medicine Plant) कुळीथाचे आरोग्यास फायदे

१.कुळीथ खुप जणांना परीचयाचा आणि आवडीचा पदार्थ.हे कुळीथ हुलगे(white horse gram) नावाने प्रसिध्द आहेत.

२.कुळीथ वापर कट,पिठले,सूप,डाल,भाजी,पराठे,इडली अश्या एकाहून एक पदार्थांसाठी केला जातो.

३.कुळीथाचा आहारात उपयोग करतांना कोणत्या आजांरामध्ये होवू शकतो हे आपण पाहूया.

अ)चुकीच्या आहार विहार मुळे मूतखडा होण्याचे प्रमाण वाढते आहे,लहान मूतखड्यात कुळीथाचा उपयोग होवू शकतो. २ ते ३ चमचे कुळीथ त्यात ६ ते ८ ग्लास पाणी टाकून उकळावे ते गाळून त्यात धने चूर्ण टाकून ते पाणी प्यावे.हे करत असताना कोमट पाण्यात बसून रोज कमरेखालील भागास शेक घ्यावा,सोबत तांदुळका-माठ-कुळीथ आमटी गव्हाचे फुलके गाईचे तूप लावलेले घ्यावे व जेवणापूर्वी गाईचे तूप घ्यावी.

ब)ज्यांना घाम कमी येतो वा येतच नाही त्यांनी कुळीथ वापर करावा.

क)मुक्कामार बसणे,ठेच लागणे यामुळे वेदना असल्यास कुळीथ पीठाचे लेप शिजवून करावा.


ड)शरीरावरील अतिरिक्त मेद चरबी कमी होण्याकरीता कुळीथ पीठ लिंबू रसात मिसळून शरीरावर चोळावे.याने अतिरिक्त घाम येण्याचे प्रमाण कमी होते.

५ ज्या व्यक्तींना चिकट,घाणेरडा वास नसलेली शौचास होत असेल त्याना कमी पाणी सेवन करणे व कुळीथ उसळ ,गव्हाचे फुलके उपयुक्त ठरतात.

६.पोटात सारखे गॅस होण्याचे प्रमाण असेल तर कुळीथ सूप,डाळिंब दाणे,हिंग,सैंधव याचा वापर करावा.

७.मूळव्याधीची लक्षणे दिसत असल्यास,गुदद्वार ओले राह्णे-तेथे खाज सुटणे-शौचास चिकट होणे-खडा शौचास होणे,जोर करावा लागणे अशी लक्षणे असता कुळीथ सूप घयावे.

८.जुनाट सर्दित १ वाटी कुळीथ कट प्यावा.

९.सतत आतड्यांतील विकृत वात दोषामुळे ढेकर येणे,बरगड्या दुखणे,छातीत-ह्रद्यात दुखणे,पोटात गोळा येणे-फुगणे ही लक्षणे असता कुळीथ सूप व सैन्धव-लिंबू घ्यावा.

१०.दम्याच्या त्रासात कुळीथ कट,हिंग,काळी मिरी घ्यावे याने दम लागण्याचे प्रमाण कमी होवून रुग्णास आराम मिळतो.११.तूनी-प्रतीतूनी म्हणजेच कंबर ते गुदद्वार ,गुदद्वार ते कंबर अशी वेदना चमक असेल तर कुळीथ सूप घ्यावे.त्यात धने चूर्ण घालावे.

सावधान!!

१.कुळीथ ऍसिडीटी च्या रुग्णांना अजिबात योग्य नाही.

२.ज्यांचे रक्त दूषीत आहे त्यांना कुळीथ योग्य नाही.

३.रात्री कुळीथ खाणे योग्य नाही.

४.कुळीथ रोज वापरणे अतिशय अयोग्य.रोज वापर करू नये.

५.ज्यांना रक्तस्त्राव सातत्याने होतो,रक्तस्त्रावाची सवय असते त्यांना पूर्णपणे निषिध्द आहे.

Dr-Rahul-Chaudhari
Dr-Rahul-Chaudhari


औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

संपर्क-९०९६११५९३०