सर्वात वर

‘बडबडी मुलं ‘

डाॅ स्वाती गानू टोकेकर

काही दिवसांपासून खेळायला येणा-या मुलांपैकी  एक मुलगा सतत काहीतरी  अखंड बडबड(Babbling kids) करत होता.त्याच्या बोलण्याला काही फार अर्थ नव्हता पण मला जाणवलं की शाळेत बडबड करणा-या मुलांपेक्षा ही बडबड वेगळी आहे.वर्गातही काही मुलं,विशेषतः मुली खूप बडबडया असतात.वास्तविक बडबड करणारी मुलं चार्मिंग,फनी आणि इंटरेस्टिंग असतात.ब-याच लहान मुलांना खूप बोलायला आवडतं  मात्र काही पालकांची अशी तक्रार असते की माझी मुलगी किंवा मुलगा खूप जास्त बडबड करतो.जे मनात येईल ते बोलतो मग त्याला अर्थ असो की नसो.अशा मुलांना बहुतेक वेळा ADHD अर्थात attention deficit Hyper active  हा प्राॅब्लेम असतो.पण हे ओळखायचं कसं?

1)जर मुलं अखंड, चुकीच्या ठिकाणी, अयोग्य वेळेला, इतरांना वैताग आणणारे असेल तर ते too much होतंय असं समजावं.

2)मुलं ओव्हर एक्साईटमेंटमध्ये किंवा नर्व्हसनेसमुळे तर अति बडबड करत नाहीत ना ते पहावे.

3) समोरचा बोलत असताना ते पूर्ण होऊ न देता मध्येच बडबड करताहेत असं लक्षात आलं तर ही अतिबडबड आहे.

4)जर संभाषण सुरु असेल आणि तुमचं मूल ते टेक ओव्हर करत असेल थोडक्यात ते विनाकारण त्यात शिरून अखंड बडबड(Babbling kids)करत असेल तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. काही वेळेला अशा मुलांना मोठी माणसे उद्धट समजतात.

मात्र 

1)कधीकधी मुलं काही टाॅपिकबद्दल पॅशनेट असतात.मग किती बोलू अन् किती नको असं वाटतं त्यांना.

 2) त्यांना एखाद्या गोष्टीचे एकेक डिटेल्स सांगायचे असतात. 

 3)त्याच त्याच गोष्टी पुन्हापुन्हा बोलत राहणं.

 4)एखाद्या गोष्टीचा त्यांना ताण असू शकतो. 

 5)स्वतःला शांत करण्याची स्ट्रॅटेजी त्यांना ठाऊक 

     नसते.

6)आपण जे बोलतोय त्याला मुलं किंवा समोरची माणसं कसा प्रतिसाद घेताहेत. त्यांची  बाॅडी लॅन्गवेज कशी आहे,ते आपल्याला टाळताहेत का,दुर्लक्ष करताहेत का हे ओळखण्याचं सोशल स्किल्स त्यांच्याजवळ नसतात. 

ह्या talkative मुलांचे बरेच प्रश्न असतात. ते म्हणजे  

1) ह्या मुलांची स्वतःच्या too much बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चाललेली धडपड, संघर्ष हा त्यांना फार फर्स्ट्रेटेड करणारा असतो.

2) मुलांना इतरांकडून चिडवलं जातं, चेष्टा केली जाते. 

3) मुलांची सेल्फ एस्टीम, सेल्फ काॅन्फिडन्स खच्ची होतो.

4)त्यांना इतर मुलं ग्रुपपासून लांब ठेवतात. 

5)त्यांच्या बद्दल निगेटिव्ह बोलतात.

या मुलांना खरोखर एक्सपर्टीजची खूप गरज असते.

आईवडिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा ADHD चा भाग आहे. मुलांना या अतिबडबडीतून थोडा तरी दिलासा देण्यासाठी पालकांना काय काय करता येईल तर

1) मूल जेव्हा थोडं शांत असेल, बोलणं ऐकून घेण्याच्या

 मनस्थितीत असेल,फोकस्ड आणि प्राॅब्लेम साॅलव्हिंग करण्यास तयार असेल तेव्हा त्याच्याशी प्राॅब्लेमबद्दल बोला.

2) अखंड बडबड जेव्हा जेव्हा कमी होईल तेव्हा रिवार्ड मिळेल अशी सिस्टीम सुरु करा.

3) त्यातून मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या वर्तनात बदल होईल. 

4) मूल आणि तुम्ही दोघांमध्ये सिक्रेट कोड, खूण किंवा सिग्नल ठरवा की जेव्हा मूल अतिबडबड करेल तेव्हा तुम्ही खूण कराल आणि मुलाने ते बोलणं थांबवायचं. 

5) हा सेल्फटाॅक मुलांना खूप मदत करतो. उपयोगी ठरतो.त्यांच्या वागण्यातील एक्सेसिव्ह क्वालिटीला कंट्रोल करतो.

6) रोल प्ले काॅनव्हरसेशनचा अनुभव मुलाला द्या. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासारखं अखंड बडबड करा आणि त्याला ऐकायची भूमिका करू द्या.  

7)या मुलांना बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावा, फोकस करायला लावा.

8) जे सुचतं ते लिहायची सवय लावा.

9) मुलांशी बोलताना मध्येमध्ये sorry I interrupt you. मी जरा carried away झाले रे असं बोलत राहिलेत की  तुमच्या या वागण्याबोलण्याचं मूल हळूहळू अनुकरण करेल.

10) बोलण्यापूर्वी मनात 1 ते 5 अंक मोजण्याची युक्ती सांगा.

11) मुलांनी प्रयत्न केला की त्यांना फीडबॅक द्या, कौतुक करा.

या सगळ्यासाठी पालकांना खूप संयम ठेवावा लागेल, वेळ द्यावा लागेल मुलांकडून प्रयत्न आणि प्रॅक्टिस करुन घ्यावी लागेल आणि त्याचं फळ नककीच गोड असेल.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती गानू टोकेकर