सर्वात वर

जून मध्ये तब्बल ९ दिवस बँका बंद राहणार

मुंबई – कोरोनामुळे नागरीकांना ऑनलाईन बँकिंगची सवय लागली असली तरी लॉक डाऊनच्या काळात  अनेकांना महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे जून मध्ये किती दिवस बँका सुरु आहे आणि बंद आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या जून महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद राहणार आहे (Banks will be Closed for 9 Days in June) त्यामुळे नागरीकांनी आपली बँकेतील कामे वेळीच उरकून घ्यावी. 

नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यातील काही सुट्ट्या या राज्यापुरती मर्यादित आहे. तर काही सुट्ट्या या प्रादेशिक बँकांपुरत्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हाला सुट्ट्यांबद्दलची माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडल्यात तर तुमची फेरी वाया जाईल.   

पाहा पूर्ण यादी

६ जून- रविवार

१२ जून- दूसरा शनिवार


१३ जून- रविवार


१५ जून- मिथुन संक्रांती आणि रझा उत्सव (Aizawl मिझोरम, भुवनेश्वर) मध्ये बँका बंद .


२०जून- रविवार


२५ जून- गुरु हरगोविंद जी यांची जयंती- जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद


२६ जून- दूसरा शनिवार


२७ जून- रविवार

३० जून- रेमना नी (फक्त Aizawl मध्ये बँका बंद राहणार)