सर्वात वर

भरली वांगी

शीतल पराग जोशी 

Bharli Wangi

साहित्य : 6/ 7 छोटी हिरवी वांगी, 1 वाटी दाण्याचा कूट, 2 चमचे तीळ,1 चमचा खोबरे किस, 8 लसूण पाकळ्या,1 टी स्पून जिरे, 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून गोडा मसाला, 1 टीस्पून हळद,तेल, जिरे, मोहोरी, हिंग

कृती : छोटी 8 वांगी धुवून घेऊन त्याला मध्ये 2 चीर पाडावी.वांग्याचे देठ ठेवणार असाल तर ठेवावे.नंतर ते मिठातल्या पाण्यात टाकावे. मसाला : तीळ आणि खोबरं किस थोडे भाजून घ्यावे. ते थंड झाले की दाण्याचा कूट, तीळ, खोबरे किस, लसूण, जिरे, तिखट, दोन्ही मसाले, थोडे मीठ एकत्र करून मिक्सरला फिरवुन घ्यावे.मसाला तयार झाला की वांगी पाण्यातून काढून घ्यावी. त्यात हा मसाला थोडा थोडा भरावा. नंतर छोटा कुकर किंवा पॅन घेऊन त्यात तेल घालावे. जिरे, मोहोरी, तडतडली की त्यात हिंग घालावे, थोडी हळद घालून हा उरलेला मसाला आणि वांगी (Bharli Wangi ) टाकून चांगले परतून घ्यावे. हवे असल्यास थोडे मीठ आणि गुळ घालावा. आणि मग त्यात पाणी घालावे. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी ते ठरवून पाणी घालावे. नंतर कुकरला झाकण लावून 1 शिटी घ्यावी. 

काहीजण कढईत पण ही भाजी करतात. पण कुकर मध्ये केली की रंग आणि चव छान लागते. अशी भरली वांगी आणि त्याबरोबर तांदूळ, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी. अहाहा काय मजा येईल ना खायला. तुम्हाला भाजी थोडी तिखट हवी असल्यास अजून तिखट टाकू शकतात. पण जरा जपून.(Bharli Wangi)

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२