सर्वात वर

BREAKING : नाशिक मधील शाळांबाबत मोठा निर्णय 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात मध्ये उद्या पासून सुरु होणाऱ्या शाळांबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशकातील सर्वच शाळा ४ जानेवारी २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जानेवारी २०२१ पर्यंत शाळा ऑनलाईन सुरु राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. 

आज कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबतच्या आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे शहर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखा रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील पवार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर,आदि उपस्थित होते.

देशासह जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात आहे.नाशिक जिल्ह्यातही १९ तारखेपासून रुग्णवाढ सुरू झालेली आहे. याचा संबंध दिवाळी बरोबर आहे की जगभरात आलेल्या दुसऱ्या लाटेशी आहे याबाबत तज्ञ सांगतील. मात्र हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे. डिसेंबर मध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे त्यामुळे  डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ४ जानेवारी पर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

पेशंट वाढले तर आहे ते कोविड सेंटर सूरु राहतील आणि गरज पडल्यास आणखीन सेंटर सुरू करण्याबाबत तयारी सुरू आहे असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे ४० शिक्षक तपासणीतुन कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून अद्याप काही अहवाल येणे बाकी आहे.

या निर्णयामुळे नववी ते बारावी च्या विध्यार्थाना आता घरूनच ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे.