सर्वात वर

ऑक्सीजन काँन्सट्रेटर साठी बंटी (प्रविण) तिदमे यांनी महापालिकेला दिला नगरसेवक निधी

ऑक्सीजन काँन्सट्रेटर खरेदी करून नगरसेवकच घेणार वार्डातील रुग्णांची काळजी  

नाशिक – नाशिक शहरात दररोज कोरोना बाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. असंख्य रुग्णांना हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन बेड मिळत नाही. रुग्णांना ऑक्सीजन काँन्सट्रेटर (oxygen concentrator) उपलब्ध झाल्यास त्या रुग्णांना घरच्या घरीच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होईल,महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रभाग २४ चे नगरसेवक बंटी (प्रविण) तिदमे यांनी आपला साडेचार लक्ष रुपयांचा नगरसेवक निधी आयुक्त कैलास जाधव यांना दिला आहे तसे पत्र ही बंटी तिदमे यांनी आज दिले आहे. 

ऑक्सिजन काँन्सट्रेटर खरेदी करण्यात यावे या साठी हा निधी देण्यात आला असून . त्यामुळे, रुग्णांना तातडीने घरगुती वापरासाठी या ऑक्सिजन काँन्सट्रेटरचा वापर करता येईल, या निधीतून १०ऑक्सिजन काँन्सट्रेटर प्रभागातील रुग्णांसाठी उपलब्ध होतील.

नाशिक मधील सर्वच नगरसेवकांनी आपला निधी दिल्यास शहरातील ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना ऑक्सीजन काँन्सट्रेटर उपलब्ध झाल्यास मोठा प्रश्न सुटणार आहे. 

या बाबत बंटी तिदमे यांनी सांगितले की आजच आयुक्तांशी चर्चा करून लवकरात लवकर हे ऑक्सीजन काँन्सट्रेटर च्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपलब्ध करून देणार आहेत.