सर्वात वर

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा उद्रेक केला आहे. कोरोनाच्या लसी पासून कोरोनाच्या उपचारात उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) तुटवडा भासतो आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्रसरकार ने घेतला असून केंद्र सरकारने रेमडेसिवीरची (Remdesivir) निर्यात थांबवल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारने घेतलेलं हे पाउल अत्यंत महत्त्वाचे आहे.जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे सुधारत नाही, तोपर्यंत रेमडेसिवीरच्या (Remdesivir) निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे

राज्यासह देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत आहे. काही खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा साठा पूर्णपणे संपला आहे. तसेच फक्त सरकारी रुग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध असल्याचे चित्र समोर आले आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे.  

मिळालेल्या  माहितीनुसार, देशातील ज्या कंपन्या रेमडेसिवीर उत्पादन करतात.त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण साठ्याची माहिती टाकावी लागणार आहे. तसेच कोणत्या वितरकाच्या माध्यमातून पुरवठा करत आहेत, हे सुद्धा वेबसाईटवर टाकावे लागणार आहे. एवढेच नाहीतर जे औषधं निरीक्षक आहेत आणि जे कोणी यासंबंधित अधिकारी आहेत, त्यांना रेमडेसिवीरचा साठा किती शिल्लक आहे, आणि रेमडेसिवीरचा (Remdesivir) काळाबाजार रोखण्यासाठी कोणते नेमके पाऊल उचलतायत हे त्यांना जाहीर करावे लागणार आहे.