सर्वात वर

..आणि रोहित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं.

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा महाराष्ट्रा सह जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांना आवडणारा कार्यक्रम गेली ६ वर्षे मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. येत्या १४ ते १६ डिसेंबर ला प्रदर्शित होणाऱ्या भागात राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील तरुण नेतेमंडळी या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. या मध्ये प्रामुख्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपचे खा. डॉ सुजय विखे पाटील शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे चे युवा आ. रोहित पवार हे महाराष्ट्रातील युवा चेहरे चला हवा येऊ द्या च्या मंचावर दिसणार आहेत.

याच कार्यक्रमात ‘पोस्टमन काका सागर कारंडे’ यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचा दुःख सांगणारं पत्र सादर केलं, आणि ते पत्र ऐकताना रोहित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं.आता या पत्राला हे तीनही नेते काय उत्तर देणार हे पाहायला विसरू नका ‘चला हवा येऊ द्या’ च्या येणाऱ्या भागात