सर्वात वर

‘चला हवा येवू दया’ च्या मंचावर कलाकारांचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स

देवमाणूस आणि कारभारी लयभारी कलाकारांची ‘चला हवा येवू दया’ च्या सेटवर

सरू आजी आणि टोण्या चा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स

मुंबई-झी मराठी वरील चला हवा येवू दया (Chala Hava Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमात दर भागात नाविन्यपूर्ण सादरीकरण करून महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन या कार्यक्रमा द्वारे होत असते. गेल्या सहा वर्षपासून यातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांची दाद मिळवत आहे,

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, हा शब्द कानावर पडताच घरातील सर्वमंडळी टीव्ही समोर येऊन बसतात.येत्या भागात चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) ‘देवमाणूस’ आणि ‘कारभारी लयभारी’ मधील कलाकारांनी, हजेरी लावली. या भागात सरू आजी आणि टोण्याच्या भन्नाट डान्स परफॉर्मन्स ने कार्यक्रमात एकाच धमाल उडवून दिली आहे.

चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी देवमाणूस आणि कारभारी लयभारी मालिकांवर स्पूफ करून एकच हास्यकल्लोळ उडवून दिला. देवमाणूस आणि कारभारी लयभारी मालिकेतील कलाकारांचा डान्स परफॉर्मन्स या आठवड्यातील खास आकर्षण असणार आहे. हा मजेशीर भाग रसिक प्रेक्षकांना २१ ते २३ डिसेंबर ला झी मराठीवर रात्री ९:३० ते १०:३० या वेळेत बघता येणार आहे,