सर्वात वर

भारताच्या किनारपट्टीवर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाची शक्यता : हवामान विभागाचा इशारा !

नवी दिल्ली -अरबी समुद्रात येऊन गेलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळा (Cyclone) नंतर भारतीय किनार पट्टीला पुन्हा एकदा मोठ्या चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ‘तौत्के’  चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह , कर्नाटक, गुजरातच्या या राज्यांच्याकिनारपट्टीवर थैमान घातलं मोठे नुकसान झाले आहे. हे वादळ शांत होते ना होते तोवर आणखी एक वादळ भारताच्या उंभरठ्यावर येऊन ठेपले आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व मध्य खाडीमध्ये २२ मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळाची मोठ्या प्रलयकारी वादळात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. बुधवारी IMDने ही माहिती दिली आहे.

या चक्रीवादळाचे (Cyclone) नाव “यास”असे असणार आहे. वातावरणात योग्य ते बदल झाल्यास २६ मेच्या संध्याकाळी हे वादळ प.बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात धडकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.त्यामुळे पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.