सर्वात वर

चंद्रपुरी वडा

शीतल जोशी,नाशिक 

लहान मुले कडधान्य खात नाहीत. असे वडे केले कि मस्त खातात . विदर्भात होळीच्या दिवशी पुरणपोलिबरोबर हा चंद्रपुरी वडा (Chandrapuri Vada) केला जातो. आणि होळीला नैवद्य म्हणून दाखवला जातो.मग काय करून बघणार ना तुम्ही पण. आणि आम्हाला जरूर कळवा कसा झाला ते.

Chandrapuri Vada

साहित्य : 1 वाटी मटकी, 1 वाटी मूग, 1/2  वाटी चवळी, 1/4 चना डाळ हे सर्व साहित्य घेऊन 5 तास भिजत ठेवावे. 

कृती : सर्व कडधान्य छान भिजल्यावर चाळणीत उपसून ठेवायचे. मग मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे. पाणी जास्त टाकायचे नाही. त्यात आले, लसूण, मिरची, पेस्ट टाकावी  मग चवीनुसार मीठ, धने पॉवडर, जिरे पावडर, चाट मसाला, तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, आणि  मस्त कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे . हवा असल्यास थोडा खायचा सोडा घालावा आणि  छान मिक्स करून गरम तेलात हे वडे तळावे . वडे हातावर किंवा प्लास्टिक वर करून मग तेलात टाकले तरी चालतील.टोमॅटो सॉस किंवा चिंचेची चटणी बरोबर चंद्रपुरी वडे (Chandrapuri Vada)छान  लागतात. 

Shital-Parag-Joshi-min
शीतल जोशी,नाशिक