सर्वात वर

लहान मुलांचे Bio-Bubble

डॉ.राहुल रमेश चौधरी एम.डी.(आयु.)

Children’s Bio-Bubble

मुंबईसध्या कोरोना नावाचा विषाणू अक्षरश: जगभर थैमान घालत आहे.भारतात सध्या त्याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक बघायला मिळतोय.भारतात पहिली लाट येवून गेली,दूसरी चालू आहे आणि तिसरी येणार असे शासनाने घोषित करून टाकले आहे.अश्या लाटांवर लाटा येतच राहतील हे सध्याच्या राज्य सरकार,केंद्र सरकार, आणि आरोग्य व्यवस्था यांच्या हतबलतेने दिसून येत आहे.यातच lockdown हा त्यांना हवा तेव्हा चालूच राहणार.मात्र राज्य व केंद्र सरकारने आयुर्वेद (Ayurveda) व होमिओपॅथी शास्त्रा कडे दुर्लक्षच केले आहे.एकावर एक संशोधने पार पडतात ,clinical trials चालू आहे आणि त्या पुर्ण होत नाहीच तोच परवानग्या असे चित्र सध्या आहे.असो..

आपल्या लेखाच्या शिर्षकाचा तो भाग नाही.सांगण्याचे तात्पर्य असे की,तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर संकट येणार लहान मुलांना जपा व लवकर त्यांचे लसिकरण सुरु करु असे शासन सांगून मोकळे झाले आहे…परंतु तेवढ्याने काहीही होणार नाही….. लहान बाळांना व लहान मुलांना लक्षणे सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला कळत नाही कि त्यांना काय होते आहे यापेक्षा त्यांची काळजी घेणे च जास्त योग्य.

लहान मुलांभोवती BIO-BUBBLE  तयार करायला हवे.हे बायो बबल आयुर्वेद(Ayurveda) पध्दतीने कसे तयार करावे त्याविषयी थोडक्यात….

१.लहान मुलांना जास्त हाताळू नये,घरातील मोठी माणसे काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडत असतात त्यामुळे आपणाकडूनच संसर्गाचा धोका जास्त आहे हे ओळखून बालकांची काळजी घ्यावी .

२.त्यांना एका योग्य व व्यवस्थित जागेत त्यांच्या खेळण्याची रांगण्याची व्यवस्था असावी. ती जागा व्यवस्थित स्वच्छ व जंतुनाशके औषधे वापरून पुसलेली असावी.

३.घरात आयुर्वेद औषधांचा वापर धूपनाकारीता करावा जेणेकरून त्यांच्या आजूबाजूची हवा खेळती व शुध्द असेल.

४.लहान बाळांचे वारंवार चुंबन घेवू नये,बाहेर कामानिमित्त जाणाऱ्यांनी शक्यतो लहान बाळांना हाताळू नयेच पण वेळ आल्यास मास्क लावावा.

५.लहान मुलांजवळ शिंकणे,खोकणे अश्या गोष्टी टाळाव्यात.

६.स्वत: आजारी असल्यास लहान मुलांपासून दूर राहावे

७.लहान मुलांना सध्याच्या काळात जंक फूड,पॅकेजेस मध्ये रेडीमेड पॅक केलेले फूड टाळावे.

८.लहान मुलांना सकस व चौरस आहार द्यावा.

९.काहीही लक्षणे दिसल्यास लहान मुलांना जवळच्या आयुर्वेद अथवा उपलब्ध डॉक्टरांना दाखवावे व योग्य तो सल्ला घ्यावा,घरीच प्रयोग करू नये.

१०.सद्यत: लहान मुलांचे online  शिक्षण चालू आहे त्यामुळे त्यांना laptop,mobile यांचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे हे असे असताना लहान मुलांचे डोळे,नजर अबाधीत राहावी याकारीत योग्य ति औषधे व screen करीता डोळ्यांना त्रास होणार याची उपाययोजना करावी.

११. लहान मुलांचे कपडे योग्य ती जंतुनाशके टाकून व्यवस्थित गरम पाण्यात धुवावीत

१२.या काळात लहान मुले घरात राहून राहून एकलकोंडी,चिडखोर,रागीट बनत आहे..त्यांच्या कलागुणांना घरातच योग्य वाव द्या…चुकले तर समजावून सांगा..त्यांचे मानसिक आरोग्य समजावून घ्या.

१३.लहान मुलांना बाळांना योग्य ति पुरेशी झोप व सकस आहाराचे नियोजन करा.

१४.आहारात तूप वरण भात,राजगीरा,फळभाज्या,फळभाज्यांची सूप,डाळ्यांचे वरण,योग्य त्या तांदूळका सारख्या पालेभाज्या,चिकन-मटण सूप द्यावे …पचन योग्य असेल तर अंडे द्यावे.

१५.लहान मुलांना योग्य ती रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे द्यावीत.जेणेकरून लहान मुले बदलत्या ऋतुसंक्रमणाला सामोरे जातील.

१६.योग्य प्रमाणात दूध,तूप,लोणी द्यावे.ड्रायफ्रूट्स चा शिरा,साय हे पदार्थ योग्य पचनशक्ती ओळखून द्यावे.बदलत्या वातावरणानुसार त्या त्या ऋतुअनुसार गोड फळे द्यावी.

१७.लहान मुले कफप्रधान प्रकृतीची असल्याने त्यांना कफाचे विकार होणार नाही यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी जेणेकरून दवाखाण्याची पायरी चढावी लागणार नाही.अति आंबट,गोड,खारट टाळावे.लहान मुलांचे आईस्क्रिम,थंड पाणी,चॉकलेट्स याचे लाड करणे टाळावे.

१८.थोडेसे आजारी पडल्यास लगेच प्रतिजैविके म्हणजेच antibiotics वापरू नये याने त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते.

१९.वेळोवेळी त्यांचे हात पाय धुवून घ्यावे.सतत चेहऱ्याला हात लावणे टाळायला लावावे.

२०.लहान बाळांना जमीनीवरील कोणतीही वस्तू सारखी तोंडात घालण्यास स्वत:हून काळजी घेवून दूर ठेवावे.

२१.लहान मुलांची खेळणी स्वच्छ धुवून पुसून खेळावयास द्यावी

२२.अनेक जण म्हणतात एवढे सांभाळून त्यांची प्रतिकार शक्ती कशी वाढेल तर ते बरोबर आहे पण ही वेळ ती गोष्ट compare करून बोलण्याची नाही त न घाबरता न घाबरवता योग्य ती आवश्यक काळजी घ्यायची आहे…

२३.गरजेची basic औषधे घरात असू द्यावी जेणेकरून लहान मुलांना काही झाल्यास व वेळेवर डॉक्टर उपलब्ध न झाल्यास योग्य त्या माहीतीनुसार बेसिक औषध देता येईल.

२४.खूप आंबवलेले पदार्थ,शिळेपदार्थ,बेकरीचे  पदार्थ देण्याचे टाळून लहान मुलांना मुगाचे लाडू,रवा-उपमा,थालीपिठ,चुरमुऱ्याचे लाडू,गुळ-तूप-पोळी असे पदार्थ द्यावे,लहान मुले अगदीच हट्टाला पेटल्यास बाहेरचे पदार्थ घरीच कमीत कमी मसाले वापरून साध्या पध्दतीने बनवून द्यावे.

२५.लहान बाळांना रव्याची तांदूळाची पेज,पातळ वरण भात,फळभाज्य उकडून त्याचे चवीनुसार सूप द्यावे.

२६.लहान मुलांना योग्य त्या प्रमाणात पाणी पिण्यास द्यावे,खेळण्याच्या-अभ्यासाच्या नादात लहान मुलांच्या शरीरातील पाण्याकडे पचन संस्थेला अनुसरून लक्ष द्यावे.

अश्या प्रकारे लहान मुलांना बायो बबल मध्ये ठेवल्यास ते जास्तीत जास्त सुरक्षित राहतील व संसर्गापासून दूर राहतील.

डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क-९०९६११५९३०