सर्वात वर

६० वर्षावरील नागरीकांची मोफत RT-PCR टेस्ट : दातार कॅन्सर जेनेटिक्सने केली मोठी घोषणा

नाशिक – कोरोनाची लागण झाली अथवा नाही याची खात्री देण्यासाठी करण्यात येणारी RT-PCR आता ६० वर्षावरील नागरीकांसाठी मोफत होणार आहे. या बाबत नाशिक येथील  दातार कॅन्सर जेनेटिक्सने (Datar Cancer Genetics) मोठी घोषणा केली आहे.सद्यस्थितीत या चाचणीसाठी ८०० ते ८५० रुपये आकारले जातात. मात्र, आता ही चाचणी ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत असणार आहे.

नाशिक शहरातील दातार जेनेटिक्सच्या (Datar Cancer Genetics) तीन संकलन केंद्रांवर ही सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यात गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालय, अंबड औद्योगिक वसाहतीतील एफ ७, डी रोड आणि त्र्यंबक रोड वरील आयटीआय या संकलन केंद्रांचा समावेश आहे.येथे ६० वर्षे वयापुढील नागरिकांच्या RT-PCR टेस्ट मोफत होणार आहे असे दातार कॅन्सर जेनेटिक्स  तर्फे सांगण्यात आले.