सर्वात वर

क्लिअरटॅक्सने एसएमईंकरिता ‘क्लिअरवन’ केले लाँच

व्यावसायिक चलन आणि ई- चलन तयार करण्यासाठी होणार मदत 

मुंबई : क्लिअरटॅक्स (Cleartax) या ईफायलिंग आणि जीएसटी पालनातील भारतातील आघाडीच्या फिनटेक सास कंपनीने भारतीय उद्योगांना डिजिटाइज आणि स्ट्रीमलाइन होण्याकरिता बिलिंग/ चलन तसेच ई- चलनच्या गरजांकरिता क्लिअरवन(ClearOne) हे जीएसटी कप्लेंट बिलिंग आणि ई- चलन उत्पादन लाँच केले आहे.

क्लिअरवन (ClearOne) सेटअप करण्यासाठी आणि बिलिंगच्या उत्पादनांकरिता वापरण्यास सोपे आहे. याद्वारे एसएमईंना त्यांच्या उद्योगासाठी प्रोफेशनल बिले तयार करता येतील. एसएमईंना व्यक्तिगतरित्या किंवा ग्राहकांच्या गरजांनुसार बिले/ चलन तयार करता येतील. तसेच चालता- फिरता बिले तयार करता येतील किंवा त्यांच्यावर नजर ठेवता येईल. हे पूर्णपणे नियामकांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले आहे.

क्लिअरटॅक्सचे(Cleartax) संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता म्हणाले, “उद्योग चालवण्यासाठी चलन महत्त्वाचे आहे. बिझनेस व्यवहार डिजिटायझेशनचा उद्देश असेल तेव्हा चलनाचे डिजिटायझेशनदेखील महत्त्वाचे आहे. बाजाराचा सखोल अभ्यास आणि उद्योगांना नेहमी सतावणाऱ्या समस्यांचे अधिक चांगले आकलन यातूनचच क्लिअरवनची (ClearOne) निर्मिती झाली आहे. त्यामुळे क्लिअरवन हे ग्राहकांना अत्यंत उपयुक्त आणि वापरण्यास सोपे जाईल अशी आम्हाला खात्री आहे.”

भारतात ५ दशलक्षांपेक्षा जास्त लघुउद्योग आहेत आणि त्यांना चलन तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर सोल्युशनची गरज आहे. यापैकी १ दशलक्ष उद्योगांना लाँचिंगच्या पहिल्या वर्षातच मदत करण्याचा क्लिअरटॅक्सचा मानस आहे. सध्या क्लिअरटॅक्स २००० पेक्षा जास्त भारतातील मोठ्या ब्रँड आणि कॉर्पोरेशनला तसेच ५ दशलक्ष वैयक्तिक करदात्यांना सुविधा पुरवतो.