सर्वात वर

२६ फेब्रुवारीला ‘व्यापारी व वाहतूकदारांचा बंद

‘२६ फेब्रुवारीच्या बंदमध्ये ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ सहभागी होणार : ललित गांधी
;कॅट’ च्या बंदला  देशभरातून सर्व व्यापारी संघटनांचे समर्थन

मुंबई – कॉन्फेडरेशन ऑफ ऑल  ट्रेडर्स (कॅट) या भारतातील सात कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या संस्थेने जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्यात. फूड सेफ्टी ऍक्ट मधील चुकीच्या तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी. तसेच टीसीएस च्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये. या प्रमुख मागण्यासाठी. शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय ‘राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद’ (Traders and Transporters) घोषित केला असून या बंदमध्ये ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज’ सहभागी होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल  ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय संघटन मंत्री  ललित गांधी यांनी दिली.

जीएसटी कायद्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये सुमारे एक हजार इतक्या दुरुस्त्या करण्यात आल्या असून, जीएसटी चे सॉफ्टवेअर सुद्धा कार्यक्षम पद्धतीने काम करत नाही. तसेच या दुरुस्त्या मध्ये नोंदणी रद्द करण्यापर्यंतची अमर्याद अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासह इतर अनेक विसंगती जीएसटी कायद्यामध्ये सातत्याने निर्माण होत आहेत. या जाचक तरतुदी रद्द करून, जीएसटी अधिक सोपा व सुटसुटीत करावा या प्रमुख मागणीसह फूड सेफ्टी ऍक्ट मधील असलेल्या जाचक तरतुदी रद्द कराव्यात, टीसीएस च्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये या मागण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया  ट्रेडर्स तर्फे 26 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय व्यापार व वाहतूक बंद घोषित केला असून, या बंदला देशभरातील विविध व्यापारी संघटनांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.  

हा बंद यशस्वी करण्यासाठी कॅट चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया व राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील पदाधिकारी कार्य करीत असून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीत या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी वाहतूकदारांनी (Traders and Transporters) या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष व  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल  ट्रेडर्स (कॅट)  चे राष्ट्रिय संघटन मंत्री ललित गांधी व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. २६ तारखेच्या एक दिवसीय बंद मध्ये, दोन तासांचे धरणे आंदोलन व जीएसटी आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रात सर्वत्र करण्यात आले असल्याची माहिती ही ललित गांधी यांनी दिली.