सर्वात वर

कोरोनाने माणसाला आंतरिक बनविले – दीपक करंजीकर

नाशिक – कोरोना ने आपल्याला आंतरिक वळविले, स्थिरता दिली , धावपळीला थोडासा व्यायाम दिला बहुश्रुतता दिली , बाहेरच्या अनावश्यक गोष्टी टाळायला शिकविले, प्रदर्शन हव्यास वाटणाऱ्या गोष्टी बंद केल्या समाजाला शहाणं केलं, प्रदूषण संपत्तीचा अपव्यय  बंद झाला, एकमेकांवरचे लादले पण कमी झाले, माणसाला पूर्णपणे वैयक्तिक केले आपल्या अस्तित्वाचे भान दिले, त्यामुळे माणूस आपल्या अंतरिक क्षमतांकडे वळला.असे प्रतिपादन लेखक अभिनेते श्री दीपक करंजीकर (Deepak Karanjikar) यांनी केले नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने शब्द जागर भेटूयात घरोघरी या व्याख्यानमालेत आपत्तीतील ऊर्जा या विषयावर ते बोलत होते 

खरंतर कोरोनाने जागतिक सभ्यतेचे स्वरूपही बदलले ,वाईट प्रथांचे निर्मूलन केले एक नवी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण केली. आपत्ती काळातील ऊर्जा माणसात परिवर्तन घडवून आणते .यासंदर्भात त्यांनी ३२ कोटी मुले आज भारतात ऑनलाईन शिक्षण घेत आहेत हे जागतिक स्तरावरचे फार मोठे काम होत आहे, अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी दोन कोटी जास्त लोक ऑनलाइन शिक्षण, व्यवसाय, व्यवहार, करीत आहेत आपण आपल्या आवडी छंद कला लेखन याकडे वळलेला होत करंजीकर यांनी सामाजिक सांस्कृतिक आर्थिक या क्षेत्रातल्या बदलांचा आढावा घेतला त्यांच्या व्याख्यानानंतर अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री भानुदास शौचे यांनी केले व माननीय श्री  दीपक करंजीकर (Deepak Karanjikar) यांचा परिचय श्री देवदत्त जोशी यांनी करून दिला आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष श्री संजय करंजकर यांनी केले यावेळी सावना पदाधिकारी डॉक्टर विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते,  गिरीश नातू, डॉक्टर शंकर बोराडे, श्री उदय मुंगी, श्री अभिजीत बगदे, व इतर कार्यकारणी सदस्य आणि नाशिककर श्रोते ऑनलाईन उपस्थित होते