सर्वात वर

Corona Update : नाशिक जिल्ह्यात आज १५३ नवे रुग्ण तर १२५१ संशयित आढळले

नाशिक शहरात ९७ नवे रुग्ण तर २३५ कोरोना मुक्त; ७ जणांचा मृत्यू , ३२४० जणांचे अहवाल येणे बाकी 

नाशिक –(Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज  कोरोनाचे एकूण १५३ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. आज रुग्णाची संख्या कमी दिसत असली तरी ३२४० जणांचे कोरोनाचे अहवाल येणे बाकी आहेत. आज जिल्ह्यात एकूण १२५१ संशयित आढळले आहेत. आज नाशिक शहरात ९७ तर ग्रामीण भागात ५६ कोरोनाचे(Corona Update )नवे रुग्ण आढळले आहे.तर २३५ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक जिल्ह्यात आज ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४० इतके झाले तर शहरात हा रेट ९६.८२ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण १९७७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १३१४ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात ९७ मालेगाव मध्ये ४,नाशिक ग्रामीण ४८ ,जिल्ह्या बाह्य ०४ रुग्ण आढळले.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९६.०५ टक्के, नाशिक शहरात ९६.८२टक्के, मालेगाव मध्ये  ९२.८४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७९  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९६.४० % इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update) – नाशिक शहरात आज ९७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ४८८ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ७१,९१४ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६९,६२८  जण कोरोना मुक्त झाले असून १३१४ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 
१) मखमलाबाद गंगापूर रोड कॅनॉल रोड नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) दिंडोरी रोड, नाशिक येथील ८४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०७
नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १९६२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९७२

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ११९१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०९

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ३२४०

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://janasthan.com/wp-content/uploads/2020/12/AGE-SEX-TEMPLATE-29-DEC-20.pdf