सर्वात वर

जिल्ह्यात आज कोरोनाचे ३०७ तर शहरात ९७ नवे रुग्ण : अपडेट झालेली मृत्यूची संख्या २७०

मागील २४ तासात : जिल्ह्यात १२० कोरोना मुक्त : ४२९ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ % : अपडेट झालेली मृत्यूची संख्या २७०

नाशिक – (Corona Update)  नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांमध्ये आज मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे.शहरातील बाधितांचा आकडा शंभरीच्या खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात आज ३०७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ९७ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज १२० जण कोरोना मुक्त झाले.महत्वाचे म्हणजे आज रोजी पोर्टलवर अदयावत झालेल्या एकूण २७० मृत्यूपैकी मागील  ४८ तासात १० मृत्यु तर मागील काही महिन्यातील २६० मृत्यू पोर्टलवर अदनावत आल्याने त्याचा समावेश जिल्हयाच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून मृत्यूची संख्या २०० ने वाढलेली  आहे. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील १६७ ग्रामीण भागातील ११, मालेगाव मनपा २ व जिल्हा बाह्य  १० मृत्यूचा समावेश आहे अशी माहिती डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे 

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.३९ % झाली आहे.आज जवळपास ४२९ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून  आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु २७०, ग्रामीण भागात ९१ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १६७ ,मालेगाव महापालिका हद्दीत २ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील १० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ९७ तर ग्रामीण भागात २०० मालेगाव मनपा विभागात ०३ तर बाह्य ०७ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९८.०९ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४८०९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १९१५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १०७३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९६.४१ %,नाशिक शहरात ९८.०९ %, मालेगाव मध्ये ९६.२२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३९%इतके आहे.

(Corona Update)   आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु -२७०

नाशिक महानगरपालिका- १६७

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-९१

जिल्हा बाह्य-१०

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ५३७३

नाशिक शहरात एकूण मृत्यू – २३७३

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०९:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक –

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३५९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी-

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४३

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  १०७३

नाशिक जिल्हयातील सध्याच्या वाढलेल्या २७० मृत्युसंख्ये बाबत प्रशासनाने केला खुलासा 

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)