सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात ४४३५ तर शहरात २४०३ कोरोनाचे नवे रुग्ण : ४१ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात ४५९६ जण कोरोना मुक्त : ४७७७ कोरोनाचे संशयित तर ७९२४ अहवाल येणे प्रतिक्षेत

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ४४३५ इतके नवे रुग्ण आढळले नाशिक शहरात आज २४०३ नवे रुग्ण आढळले आहे. आज जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्नांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज जवळपास ४७७७ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून आज ४१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.आज ग्रामीण भागात सर्वात जास्त म्हणजे २६ जणांचा मृत्यू झाला असून वर्ष भरात सर्वात जास्त मृत्यूची आज नाशिक जिल्ह्यात नोंद झालीआहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २४०३ तर ग्रामीण भागात १८३२ मालेगाव मनपा विभागात १५० तर बाह्य ५० अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४७७७ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ४५९६ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७२ इतके झाले तर शहरात हा रेट ८५.३७ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३८३७८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१२८४ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ७९२४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ४१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८१.०६ %,नाशिक शहरात ८५.३७%, मालेगाव मध्ये ७८.८९% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.९४ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.७२ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४१

नाशिक महानगरपालिका-०९

मालेगाव महानगरपालिका-०४

नाशिक ग्रामीण-२६

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २८५७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १३२३

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ९:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४३७०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२९२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ७९२४

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)