सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात ५०६७ तर शहरात २९३५ कोरोनाचे नवे रुग्ण : ३५ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात ४२०५ जण कोरोना मुक्त : ५९५५ कोरोनाचे संशयित तर  ७६४७ अहवाल येणे प्रतिक्षेत

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ५०६७इतके नवे रुग्ण आढळले नाशिक शहरात आज २९३५ नवे रुग्ण आढळले आहे.आज जवळपास ५९५५ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून आज ३५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.रुग्ण संख्या काल पेक्षा जरा कमी जरी असली तरी मृत्यू वाढता आहेत हि चिंतेची बाब आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २९३५ तर ग्रामीण भागात १९९८ मालेगाव मनपा विभागात ८८ तर बाह्य ४६ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे  ५९५५  संशयित रुग्ण आढळले आहे. तर  ४२०५  जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.८१ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३८५८० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१७४२ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ७६४७ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८१.०४ %,नाशिक शहरात ८४.८१%, मालेगाव मध्ये ७८.९९% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.५८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात  २९३५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण  १३५३   क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,५२,०७६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,२८,९८० जण कोरोना मुक्त झाले तर  २१,७८२ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २९

नाशिक महानगरपालिका-१९

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-१६

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २८१६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १३१४

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ९:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ११

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५५६१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३०३

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ७६४७

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)