सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट आज ६५०८ नवे रुग्ण :३४ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात शहरात ३२८९ रुग्ण तर ४८७२ कोरोनाचे संशयित ; ६१७२ अहवाल येणे प्रतिक्षेत ;३०३३ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक आकडा आला आहे आज जिल्ह्यात तब्बल ६५०८नवे रुग्ण आढळले असून नाशिक शहरात ही ३२८९ नवे रुग्ण आढळल्याने नाशिककरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. आजचा आकडा हा वर्षभरातील सर्वात मोठा आहे. आज कोरोनामुळे जिल्ह्यात ३४ जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक शहरात ही सातत्याने रुग्ण वाढ होते आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.शक्यतो बाहेर पडू नका आणि बाहेर जाणे गरजेचे असल्यास मास्क घाला ,नियमित हात धुवा,सुरक्षित अंतर पाळा 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात  ३२८९  तर ग्रामीण भागात २९४१ मालेगाव मनपा विभागात १२५ तर बाह्य १५३ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४८७२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३०३३ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.८९ इतके झाले तर शहरात हा रेट ८३.३३ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३५८५१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१३५७ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६१७२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८१.३० %,नाशिक शहरात ८३.३३%, मालेगाव मध्ये ७६.५०% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.५३ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.८९ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३४(Corona Update)  

नाशिक महानगरपालिका-११

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-१९

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २५८७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२२५

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०९

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४५०३

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३०९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ६१३२

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/04/AGE-SEX-TEMPLATE-8-APR-2021.pdf