सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ५००५ नवे रुग्ण तर ३८६१ कोरोना मुक्त : ५७ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात शहरात २७७७ कोरोनाचे नवे रुग्ण : ४५१७ कोरोनाचे संशयित तर ६०५५ अहवाल येणे प्रतिक्षेत 

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ५७ जणांचा मृत्यू झाला ही अतिशय चिंतेची बाब आहे. आज ग्रामीण भागात ४३ जणांचे मृत्यू झाले आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे ५००५ तर शहरात २७७७ असे नवीन रुग्ण आढळले आहे. आज जवळपास ४५१७ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून ३८६१ कोरोना मुक्त झाले आहेत. 

महाराष्ट्रात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कडक लॉक डाऊन ची घोषणा करतील असे सूत्रांकडून समजते आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २७७७ तर ग्रामीण भागात २१६७ मालेगाव मनपा विभागात २१ तर बाह्य ४० अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.५७ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.७९ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४२२४२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २४०१४ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६०५५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ५७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८१.५६ %,नाशिक शहरात ८४.७९%, मालेगाव मध्ये ७८.५२% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.६६ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.५७ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ५७

नाशिक महानगरपालिका-०९

मालेगाव महानगरपालिका-०३

नाशिक ग्रामीण-४३

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३०३२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १३८७

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०९

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४१२५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५१

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३०९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ६०५५

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)