सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ५७४९ नवे रुग्ण तर ४९१३ जण कोरोना मुक्त : ४० जणांचा मृत्यू

मागील २४ तासात शहरात ३३६५ कोरोनाचे नवे रुग्ण :५४१२ कोरोनाचे संशयित तर ७१९०अहवाल येणे प्रतिक्षेत 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ५७४९ इतके नवे रुग्ण आढळले नाशिक शहरात आज ३३६५ नवे रुग्ण आढळले आहे.आज जवळपास ५४१२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून ४९१३ कोरोना मुक्त झाले आहेत.  आज ४० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.आज ग्रामीण भागात २३ जणांचा मृत्यू झाला असून शहरात १७ जणांच्या  मृत्यूची आज नोंद झाली आहे. 

उद्या पासून नाशिक शहरात जनता कर्फ्यू आहे .नाशिक सिटीझन फोरम आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचा सह अनेक संघटना या  जनता कर्फ्यू  मध्ये सहभागी होणार असून नागरीकांनी आणि व्यापाऱ्यांनी या  जनता कर्फ्यू  मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे या आवाहनाला आताच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पाठींबा दिला असून विविध सांस्कृतिक संस्थांना देखील या जनता कर्फ्यू सर्वांना सहभागी होऊन कोरोनाला विरुद्ध लढाई लढूया आणि हा जनता कर्फ्यू यशस्वी करूया असे परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.   

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३३६५ तर ग्रामीण भागात २२४९ मालेगाव मनपा विभागात ५० तर बाह्य ८५ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ५४१२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ४९१३ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३० इतके झाले तर शहरात हा रेट ८५.७९ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३८४६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१४२४ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ७१९० अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.   अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८१.९० %,नाशिक शहरात ८५.७९%, मालेगाव मध्ये ७९.१६% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६७ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.३० %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात ३३६५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १४४४   क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,६०,३०३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,३७,५२२ जण कोरोना मुक्त झाले तर   २१,४२४ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४०

नाशिक महानगरपालिका-१७

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-२१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २९३५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १३५७

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ९:१५वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०७

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५०३९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२९४

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ७१९०

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)