सर्वात वर

Nashik : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ आज ६८४५ नवे रुग्ण : ४० जणांचा मृत्यू

मागील २४ तासात शहरात ३८७० कोरोनाचे नवे रुग्ण : ६७५७ कोरोनाचे संशयित तर ५८२३ अहवाल येणे प्रतिक्षेत : ४११७ जण कोरोना मुक्त    

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली अशीं आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ६८४५इतके नवे रुग्ण आढळले नाशिक शहरात आज ३८७० नवे रुग्ण आढळले आहे.आज जवळपास ६७५७ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून ४११७ कोरोना मुक्त झाले आहेत.आज ४० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.आज ग्रामीण भागात १९ जणांचा मृत्यू झाला असून शहरात २१ जणांच्या  मृत्यूची आज नोंद झाली आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३८७० तर ग्रामीण भागात २७४८ मालेगाव मनपा विभागात १६१ तर बाह्य ६६ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८९ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.९५ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४११५५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २३३३२ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ५८२३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. (Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८१.६३ %,नाशिक शहरात ८४.९५%, मालेगाव मध्ये ७८.६५% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात  ३८७० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण  १५०४     क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  १,६४,१७३  रुग्ण झाले आहेत. त्यापैकी  १,३९,४६३ जण कोरोना मुक्त झाले तर    २३,३३२ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४०

नाशिक महानगरपालिका-२१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-१९

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २९७५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १३७८

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी १०:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६४५६

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२१७

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ५८२३

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)