सर्वात वर

Corona Update : ४८ तासात जिल्ह्यात ५३३ तर शहरात ३७१ नवे रुग्ण

नाशिक जिल्ह्यात ४८ तासात ६३१ रुग्ण कोरोना मुक्त ; ६ जणांचा मृत्यू 

नाशिक –(Corona Update) नाशिक जिल्ह्यात गेल्या ४८ तासात कोरोनाचे ५३३एकूण नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी नाशिक शहरात ३७१ (Corona Update )नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ९४७ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ६३१ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे काळ आणि आज नाशिक जिल्ह्यात आज ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ इतके झाले तर शहरात हा रेट ९६.८४ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २३९६पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १२९२ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २०० मालेगाव मध्ये ०४,नाशिक ग्रामीण ८८ ,जिल्ह्या बाह्य ०६ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ७३९ जणांचे अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

(Corona Update)

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९४.७२,टक्के, नाशिक शहरात ९६.८४ टक्के, मालेगाव मध्ये  ९२.६७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.४१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९६.०१ % इतके आहे. 

आज शहराची स्थिती –नाशिक शहरात काल आणि आज ३७१ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५९९ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ७१,५२३ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६९,२६३ जण कोरोना मुक्त झाले असून १२९२ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 
१) १२, रंगनाथ अपार्टमेंट,काठे गल्ली, द्वारका येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२)उपेंद्र नगर, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

३) गणेश चौक, सिडको, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे

(सदरचा अहवाल दि.२५ व २६ डिसेंबर २०२० या दोन दिवसांचा आहे)

काल आणि आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०३

नाशिक महानगरपालिका-०३

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १९४५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९६८

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०४

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ९२०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०४

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ७३९ 

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा )