सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ४७१८ नवे रुग्ण तर ५३८७ जण कोरोना मुक्त : ३८ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात शहरात २४५९ कोरोनाचे नवे रुग्ण : ४७९० कोरोनाचे संशयित तर ८४९५ अहवाल येणे प्रतिक्षेत 

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे  ४७१८  इतके नवे रुग्ण आढळले नाशिक शहरात आज २४५९ नवे रुग्ण आढळले आहे.आज जवळपास ४७९० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून आज ३८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.आज ग्रामीण भागात २० जणांचा मृत्यू झाला असून शहरात १७ जणांच्या मृत्यूची आज नोंद झाली आहे. 

नाशिक शहरात लॉक डाऊन शिवाय पर्याय राहिला नाही असे मत आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. नाशिकच्या व्यापाऱ्यांनी देखील जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाउन करा आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा या लॉक डाउनला पाठिंबा असेल असे सांगितले आहे. या बाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून आता तेच लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतील असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगतले   

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २४५९ तर ग्रामीण भागात २१९९ मालेगाव मनपा विभागात ३१ तर बाह्य २९ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४७९० संशयित रुग्ण आढळले आहे. तर ५३८७ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२८ इतके झाले तर शहरात हा रेट ८५.५४ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३८६७१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१३५५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ८४९५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.   अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८२.२० %,नाशिक शहरात ८५.५४%, मालेगाव मध्ये ७९.५२% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.५५ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.२८ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात   २४५९   जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण  १४४४   क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  १,५६,९३८   रुग्ण झाले आहेत. त्यापैकी  १,३४,२४३   जण कोरोना मुक्त झाले तर  २१,३५५ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४१

नाशिक महानगरपालिका-१७

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-२०

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २८९५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १३४०

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १२

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४३७९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६१

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३०१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ८४९५

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)