सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ६२०७ जण कोरोनामुक्त तर ३९७८ नवे रुग्ण

मागील २४ तासात शहरात २०७९ कोरोनाचे नवे रुग्ण : ५१५१ कोरोनाचे संशयित ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ टक्के तर ३८ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणात वाढ झाली असून आज  कोरोनाचे ६२०७ जण कोरोना मुक्त झाले आहे.तर जिल्ह्यात ३९७८ नवे रुग्ण आढळले आहेत.आज ही नव्या रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे हि दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ८५.७१ झाली आहे.आज शहरात कोरोनाचे २०७९ रुग्ण आढळले आहेत. आज जवळपास ५१५१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३८ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २५ जणांचे मृत्यू झाले आहे. तर नाशिक शहरात ०९ ,मालेगाव महापालिका हद्दीत ४ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २०७९ तर ग्रामीण भागात १७९६मालेगाव मनपा विभागात ३७ तर बाह्य ६६ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ इतके झाले तर शहरात हा रेट ८६.९२ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४२३१३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २३४४४ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ८८७५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८३.७४ %,नाशिक शहरात ८६.९२ %, मालेगाव मध्ये ८२.८० % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.८९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३८

नाशिक महानगरपालिका-०९

मालेगाव महानगरपालिका-०४

नाशिक ग्रामीण-२५

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३४५७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १५१९

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४८३२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२३८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ८८७५

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)