सर्वात वर

Nashik : आज जिल्ह्यात कोरोनाचे ३५८८ तर शहरात १८८७ नवे रुग्ण: ३८ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात कोरोनाचे ४६७२ संशयित तर १०१४८ अहवाल येणे प्रतिक्षेत ; ३९२८ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update) आज जिल्ह्यात कोरोनाचे एकूण  ३७४१  रुग्ण आढळले असून त्यापैकी नाशिक शहरात १८४६नवे रुग्ण आढळले आहेत.आज जिल्ह्यात मृतांचा आकड्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात ३८ त्यापैकी शहरात १३ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात काही दिवसापासून मृत्यूचे प्रमाण अधिक होते आहे आज ग्रामीण भागात कोरोनामुळे २२ जणांना आपला जीव गमवावा लागला. 

आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्त होण्याचा आकडा जरी जास्त असला तरी धोका टाळला नाही. त्यामुळे लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टर कडे जाणे गरजेचे आहे.नागरीकांनी स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.शक्यतो बाहेर पडू नका आणि बाहेर जाणे गरजेचे असल्यास मास्क घाला ,नियमित हात धुवा,सुरक्षित अंतर पाळा असे आवाहन करण्यात आले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १८८७ तर ग्रामीण भागात १५६८ मालेगाव मनपा विभागात ९५ तर बाह्य ३८ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४६७२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर  ३९२८ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१५ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.४६ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३६६४२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २०९९३ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण  १०१४८ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८१.१० %,नाशिक शहरात ८४.४६%, मालेगाव मध्ये ७९.५६% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.२९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.१५ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १८८७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२५१ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,४३,२१२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,२०,९५२  जण कोरोना मुक्त झाले तर २०,९९३ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

Corona Updateआज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३८

नाशिक महानगरपालिका-१३

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-२२

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २७२०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२६७

Corona Updateनाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ११

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४३१६

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३०

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४९

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२६६

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  १०१४८

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)