सर्वात वर

Nashik : आज जिल्ह्यात कोरोनाचे ३७४१ तर शहरात १८४६ नवे रुग्ण: ३१ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात कोरोनाचे ४५४५ संशयित तर १०८५१ अहवाल येणे प्रतिक्षेत ; ३७९७ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात कोरोनाचे एकूण  ३७४१  रुग्ण आढळले असून त्यापैकी नाशिक शहरात १८४६नवे रुग्ण आढळले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची  घेतली त्यामध्ये राज्यातील लॉक डाउन बाबत १४ एप्रिल नंतर कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले . लॉक डाउन १४ दिवसांचा असावा असे मत टास्क फोर्सचे म्हणणे आहे लॉक डाउन त्यानंतरच कोरोनाची साखळी तोडण्यात यश येईल अशी बैठकीत चर्चा झालेचे सूत्रांकडून समजते आहे. 

नागरीकांनी स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.शक्यतो बाहेर पडू नका आणि बाहेर जाणे गरजेचे असल्यास मास्क घाला ,नियमित हात धुवा,सुरक्षित अंतर पाळा असे आवाहन करण्यात आले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १८४६ तर ग्रामीण भागात १७९१ मालेगाव मनपा विभागात २८ तर बाह्य ७६ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४५४५ संशयित रुग्ण आढळले आहे. तर  ३७९७ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७४ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.१५ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३७०२० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २११४८ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण  १०८५१ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८०.५८ %,नाशिक शहरात ८४.१५%, मालेगाव मध्ये ७८.६१% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.१९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.७४ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १८४६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२२५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,४१,३२५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,१८,९२३ जण कोरोना मुक्त झाले तर २१,१४८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

Corona Updateआज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३१

नाशिक महानगरपालिका-०९

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-२१

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २६८२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२५४

Corona Updateनाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ११

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४१५२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३८

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२८१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  १०८५१

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)