सर्वात वर

Nashik : आज जिल्ह्यात कोरोनाचे ४२९४ तर शहरात २०८७ नवे रुग्ण : ३१ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात कोरोनाचे ४६३३ संशयित तर ९६४१ अहवाल येणे प्रतिक्षेत ; ३३९१ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात कोरोनाचे एकूण  ४२९४   रुग्ण आढळले असून त्यापैकी नाशिक शहरात २०८७नवे रुग्ण आढळले आहेत. प्रशासन दिवस रात्र काम करत आहे.पण नागरीकांनी विनाकारण बाहेर न पडून स्वतः बरोबर इतरांची ही काळजी घेतली पाहिजे तर कोरोनाला खऱ्या अर्थाने रोखता येईल.आज मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठकीत कडक लॉक डाउन शिवाय पर्याय नाही असे संकेत दिले आहेत. लॉक डाउन नंतरच कोरोनाची साखळी तोडण्यात यश येईल असे हि मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.  

नागरीकांनी स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.शक्यतो बाहेर पडू नका आणि बाहेर जाणे गरजेचे असल्यास मास्क घाला ,नियमित हात धुवा,सुरक्षित अंतर पाळा असे आवाहन करण्यात आले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २०८७ तर ग्रामीण भागात २०२८ मालेगाव मनपा विभागात ७७ तर बाह्य १०२ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे  ४६३३  संशयित रुग्ण आढळले आहे. तर  ३३९१  जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.४३ इतके झाले तर शहरात हा रेट ८३.६५ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३७१०७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१५५६ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण  ९६४१ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८०.५२ %,नाशिक शहरात ८३.६५%, मालेगाव मध्ये ७८.८०% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.३२ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.४३ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात २०८७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२२५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,३९,४७९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,१६,६७८ जण कोरोना मुक्त झाले तर २१,५५६ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३१ (Corona Update) 

नाशिक महानगरपालिका-१५

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-१५

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २६५१

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२४५

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:३०वा पर्यंत)(Corona Update) 

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – २०

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४२११

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३२२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ९६४१

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)