सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक आज तब्बल ६८२९ नवे रुग्ण तर ४९७९ जण कोरोना मुक्त

मागील २४ तासात शहरात ४०७६ नवे रुग्ण तर ९५६४ कोरोनाचे संशयित ; ७५२० अहवाल येणे प्रतिक्षेत ; २९ जणांचा मृत्यू  

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात गेले २ दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होतांना दिसत होते पण आज मात्र नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने उद्रेक केला असून आज तब्बल ६८२९इतके नवे रुग्ण आढळले असून आजचा आकडा वर्षभरातील सर्वात मोठा आहे.नाशिक शहरात ही कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर आढळली असून आज शहरात ४०७६ नवे रुग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज जवळपास ९५६४ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. हि चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात आज २९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ४०७६ तर ग्रामीण भागात २५८५ मालेगाव मनपा विभागात ६१ तर बाह्य १०७ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ९५६४ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ४९९७ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.७६ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३७७५३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१४३७ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ७५२० अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे २९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)   – नाशिक ग्रामीण मधे ८१.१९ %,नाशिक शहरात ८४.७६%, मालेगाव मध्ये ७९.०९% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.३९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात  ४०७६  जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण  १२९७  क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  १,४९,१४१   रुग्ण झाले आहेत. त्यापैकी  १,२६,४०९  जण कोरोना मुक्त झाले तर  २१,४३७   जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update) – आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २९

नाशिक महानगरपालिका-१४

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-१५

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २७८१

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२९५

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ९:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ९१६५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३२

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ८६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२७५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ७५२०

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले याची लिस्ट अद्याप प्राप्त झाली नाही