सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.८९% तर शहरात ९२.५० %

उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३ हजार २३६ ने घट

(Corona Update) जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख २७ हजार ३१२  रुग्ण कोरोनामुक्त ; सद्यस्थितीत २८  हजार ८५९  रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होते आहे.उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३ हजार २३६ ने घट झाली असून नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.आज दुपारी १२ वाजे पासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कडक लॉक डाऊनला सुरुवात झाली असून २३ तारखे पर्यंत सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.नागरीकांना अत्यावश्यक कामा शिवाय बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.या लॉक डाऊन मुळे जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यास मोठयाप्रमाणत मदत होणार आहे असे जाणकारांचे मत आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख  २७  हजार ३१२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २८ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३ हजार २३६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

(Corona Update) उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ३५८,  बागलाण १ हजार १०, चांदवड १ हजार १८, देवळा ७१५, दिंडोरी ९३८, इगतपुरी ३०९, कळवण  ५७६, मालेगाव ४५९, नांदगाव ५९२, निफाड १ हजार ६५६, पेठ १०१, सिन्नर २ हजार १९, सुरगाणा ४३१, त्र्यंबकेश्वर ३३४, येवला ३७९ असे एकूण १२ हजार ८९५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १४  हजार २०९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४९० तर जिल्ह्याबाहेरील २६५ असे एकूण २८ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख ६० हजार १०६   रुग्ण आढळून आले आहेत.

(Corona Update) रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८८.७३ टक्के, नाशिक शहरात ९२.५० टक्के, मालेगाव मध्ये  ८५.२३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.८४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.८९  इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण १ हजार ८८५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ६७४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २७७ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ३ हजार ९३५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

लक्षणीय :

◼️३ लाख ६० हजार १०६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख २७ हजार ३१२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  २८ हजार ८५९ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.८९ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)