सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ३७ हजार ६६१ रुग्ण कोरोनामुक्त

सद्यस्थितीत ४६  हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक – (Corona Update) नाशिक मध्ये कोरोना रुग्णाचे प्रमाण जरी मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाणात ही मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. अनेक रुग्ण घरच्या घरीच उपचार करून कोरोना मुक्त होत आहेत.१ तारखे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस मिळणार आहे.लस घेतल्यानंतर आपण या संकटावर लवकरात लवकर मात करू शकणार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

(Corona Update) आज जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख  ३७  हजार ६६१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४६ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार १७७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

(Corona Update)उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ७५७, चांदवड १ हजार ६२७, सिन्नर १ हजार ७७६, दिंडोरी १ हजार ४३९, निफाड ३ हजार १७५, देवळा १ हजार २१०, नांदगांव ९२८, येवला ८१३, त्र्यंबकेश्वर ६१०, सुरगाणा ३६३, पेठ २३१, कळवण ७७६,  बागलाण १ हजार ५००, इगतपुरी ५३५, मालेगांव ग्रामीण ९४०  असे एकूण १७  हजार ६८० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७  हजार ३४६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१७  तर जिल्ह्याबाहेरील २२४  असे एकूण ४६  हजार ६६७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २ लाख ८७ हजार ८०५ रुग्ण आढळून आले आहेत.

(Corona Update) – रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८०.७३  टक्के, नाशिक शहरात ८३.४६ टक्के, मालेगाव मध्ये  ८१.९४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.७७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५८  इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण १ हजार ४०९ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ४३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३४  व जिल्हा बाहेरील ९५ अशा एकूण ३ हजार १७७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

लक्षणीय :

◼️२ लाख ८७ हजार ८०५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ३७ हजार ६६१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ४६  हजार ९६७ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५८टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)