सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १२२२ तर शहरात ४५६ रुग्ण : ५८ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात जिल्ह्यात १३१९ कोरोना मुक्त : २०६५ कोरोनाचे संशयित;रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६१ %

नाशिक – (Corona Update)  आज नाशिक जिल्ह्यात १२२२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ४५६ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज १३१९जण कोरोना मुक्त झाले. 

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९४.६१ % झाली आहे.आज जवळपास २०६५ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ५८ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ३९ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १८ ,मालेगाव महापालिका हद्दीत १ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ४५६ तर ग्रामीण भागात ७२६ मालेगाव मनपा विभागात ४० तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.६४ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १६,०६६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५५७१ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ४५२९ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९१.८१ %,नाशिक शहरात ९६.६४ %, मालेगाव मध्ये ८८.९३% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.६१ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ५८

नाशिक महानगरपालिका-१८

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-३९

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४३३८

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १८४०

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक –

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १९२८

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २१

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१०८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ४५२९

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)