सर्वात वर

आज नाशिक जिल्ह्यात ४७६९ जण कोरोनामुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९३ टक्के

मागील २४ तासात जिल्ह्यात तर ५६७५ शहरात २७२७ कोरोनाचे नवे रुग्ण : ५५२६ कोरोनाचे संशयित तर ३९ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Corona Update),आज जिल्ह्यात कोरोनाचे ४७६९ जण कोरोना मुक्त झाले आहे.तर जिल्ह्यात ५६७५ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ८२.९३ झाली आहे.आज शहरात कोरोनाचे २७२७ रुग्ण आढळले आहेत. आज जवळपास ५५२६ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३९ जणांचा मृत्यू झाला  आज ग्रामीण भागात २६ जणांचे मृत्यू झाले आहे. तर नाशिक शहरात ११ ,मालेगाव महापालिका हद्दीत १ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २७२७ तर ग्रामीण भागात २७०९ मालेगाव मनपा विभागात १२१ तर बाह्य ११८ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९३ इतके झाले तर शहरात हा रेट ८३.९५ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४८५७१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २७७९७ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ५३९८ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८१.०६ %,नाशिक शहरात ८३.९५ %, मालेगाव मध्ये ८१.३८% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.७८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९३ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात २७२७जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १९५२    क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,८२,३७६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,५३,०९७ जण कोरोना मुक्त झाले तर      २७,७९७ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३९

नाशिक महानगरपालिका-११

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-२६

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३३११

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १४८२

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५१९२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४९

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२५३

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ५३९८

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)