सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७८ तर शहरात २७५ नवे रुग्ण

मागील २४ तासात : जिल्ह्यात १०४४ कोरोना मुक्त : ११८८ कोरोनाचे संशयित तर ३५ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६७ %

नाशिक – (Corona Update)  नाशिक जिल्ह्यात आज ६७८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात २७५ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज १०४४ जण कोरोना मुक्त झाले.आजचा रुग्णसंख्येचा आकडा जरी कमी वाटत असला तरी आजच्या रुग्ण संख्येत काल पेक्षा वाढ झाली आहे. काही दिवसापासून  रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात अंशतः लॉक डाऊन शिथिल केला.पण नागरीकांनी खरेदी साठी गर्दी केल्या मुळे काही दुकाने बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली. कोरोनाचा धोका अद्याप कमी झाला नसून सर्वांच्या प्रयत्नातून हा कोरोना हद्दपार करायचा आहे.त्यासाठी सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९६.६७ % झाली आहे.आज जवळपास ११८८ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १३ ,मालेगाव महापालिका हद्दीत २ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २७५ तर ग्रामीण भागात ३७७ मालेगाव मनपा विभागात १४ तर बाह्य १२ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.४९ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ८०८१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ३५७९ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १७५८ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९५.४६ %,नाशिक शहरात ९७.४९ %, मालेगाव मध्ये ९५.८४ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६७ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३५

नाशिक महानगरपालिका- १३

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-२०

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४७८९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – २०३६

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक –

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०८८

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी-

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३०

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  १७५८

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)