सर्वात वर

आज नाशिक जिल्ह्यात ५२२१ कोरोना मुक्त तर २३६६ नवे रुग्ण

मागील २४ तासात  शहरात १२१७ कोरोनाचे नवे रुग्ण : २८७५ कोरोनाचे संशयित,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७४ % तर ३५ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आजही मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे काल ही रुग्णसंख्या कमी झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनमुक्त होण्याचे प्रमाण वाढले ऑन आज जिल्ह्यात ५२२१ जण कोरोना मुक्त झाले आहे.तर जिल्ह्यात २३६६ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे हि दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९१. ७४  % झाली आहे.आज शहरात कोरोनाचे १२१७ रुग्ण आढळले आहेत. आज जवळपास २८७५ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात १२ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात २३ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १२१७ तर ग्रामीण भागात १०९७ मालेगाव मनपा विभागात ५२ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७४ % इतके झाले तर शहरात हा रेट ९२.९९ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २२९६९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १३२४४ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६२५५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९०.२५%,नाशिक शहरात ९२.९९ %, मालेगाव मध्ये ८५.२७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.४३%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.७४%इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३५

नाशिक महानगरपालिका-२३

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-१२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३९७०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १६९७

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक –

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २५९९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३८

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२१७

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ६२५५

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)