सर्वात वर

कोरोनाच्या लसी बाबत शनिवारी भारतीयांना चांगली बातमी मिळणार ?

पुणे-(Covid Vaccine Live Updates )कोरोनाच्या लसीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.या लसी बाबत लवकरच एक चांगली बातमी भारतीयांना  मिळण्याची शक्यता आहे ? येत्या २८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे.त्यावेळी ते लस वितरणा बाबत भारतीयांना गोड बातमी देतील असे बोलले जात आहे.पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला १०० देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत. 

काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला होता.यावेळी कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल.पण कोरोनाबाबत सतर्क राहा,असे पंतप्रधानांनी सांगितले होते.भारतात या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.मात्र त्या आधीच लशीला आपात्कालीन मंजुरीही मिळू शकते, असं सांगितलं जातं आहे.