सर्वात वर

नाशिक शहरात खरेदीसाठी झुंबड : सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

उद्या पासून सुरु होणाऱ्या लॉक डाउनच्या पार्श्वभूमीवर नागरीक नियम तोडून रस्त्यावर 

नाशिक – नाशिक जिल्ह्यात उद्या दुपारी १२ वाजेपासून १० दिवसांचा कडक लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये प्रमुख बाजार पेठेत नागरीकांनी विक्रमी गर्दी करून (Crowd for shopping in Nashik) प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र आज संपूर्ण शहरात बघायला मिळाले. या गर्दीचे अनेक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.त्यामुळे जर पुन्हा कोरोना वाढला तर या गर्दीला जवाबदार कोण याची खमंग चर्चा समाजमाध्यमात अनेक ग्रुप वर सुरु होती.

प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा कडक लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला असला तरी नाशिककरांची प्रचंड गर्दी (Crowd for shopping in Nashik) झाल्याने कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.आज सकाळपासूनच दुकाने, पेट्रोल पंपावर  प्रचंड गर्दी बघायला मिळाली .आगामी १० दिवसाचा साठा करण्यामागे नाशिककरांचा कल होता. दुकानांसाठी अकरा वाजे पर्यंत  वेळ देण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरातील नागरीक एकाच वेळी खरेदीसाठी बाहेर पडले त्यामुळे कुठेतरी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल कारण एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक बाहेर पडल्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे.

उद्या दिनांक १२ मे दुपारी १२ वाजेपासून २३ मे पर्यंत हा कडक लॉकडाऊन (Crowd for shopping in Nashik)ठेवण्यात आला असून ठराविक वेळेत नागरीकांना आवश्यक गोष्टी घरपोच मागवता येणार आहेत.असे जरी असले तरी आज नागरीकांनी गर्दीकरून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले आहे.