सर्वात वर

‘तौत्के’ चक्रीवादळ रात्री गुजरातला धडकणार

महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे ,पालघर जिल्ह्यात काय असेल स्थिती

मुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळने (Cyclone Tautke) रोद्ररूप धारण केले असून रायगडला रेड अलर्ट तर मुंबई सह ठाणे,पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हे वादळ आता मुंबई पासून १२० किलोमीटर दूर असून त्यामुळे  आज सकाळ पासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून कुलाबा वेधशाळेने १०२ किमी प्रति तास एवढी वाऱ्याची नोंद करण्यात आली आहे.आज हे वादळ रात्री ८ ते ११ वाजे पर्यंत गुजरातला धडकण्याची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे. 

‘तौत्के’ चक्रीवादळच्या (Cyclone Tautke) पार्श्वभूमीवर मुंबईतील विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. कोकणा मध्ये अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.गुजरातला हे वादळ धडकल्या नंतर  येत्या ४८ तासात वाऱ्याचा वेग मंदावणार असून माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची हि शक्यता आहे.  

‘तौत्के’ चक्रीवादळाची (Cyclone Tautke) तीव्रता आणखी वाढली असून,आता ते अत्यंत तीव्र चक्रीवादळ (Extremely Severe Cyclone) बनले आहे. या वादळाच्या केंद्राभोवतीच्या वाऱ्यांचा वेग ताशी १८० ते १९० किमी प्रती तासापर्यंत वाढला असून,काही वेळा वारे अधिकाधिक ताशी २०० किमीचा वेगही गाठत आहेत.

‘तौत्केचे केंद्र (Cyclone Tautke) सध्या वसईपासून पश्चिमेला सुमारे २०० किलोमीटरवर पोचले आहे त्यामुळे वादळी वाऱ्यांचा प्रभाव पालघर,ठाणे,मुंबई आणि रायगडवर कायम राहील .संपुर्ण रायगड,रत्नागिरी,पालघर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात वाऱ्याचा वेग वाढलेला असून  संततधार पाऊसा मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नाशिक,पुणे,सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागांतही वाऱ्यांचा जोर असेल.


रत्नागिरी, घाट क्षेत्रात, नाशिक,पुणे,सातारा, कोल्हापूरया  जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.तरी नागरिकांनी वादळी वारे सुरू असताना प्रवास टाळावा.अश्या वातावरणात विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका असतो त्यामुळे घरातून बाहेरच पडू नये असे आवाहन पर्यावरण व हवामान अभ्यासक राहुल रमेश पाटील यांनी केले आहे.