सर्वात वर

“यास” चक्रीवादळ येत्या २४ तासात ओडिशा-बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार

पं बंगाल ओडिशा सह सहा राज्यांना सतर्कतेचा इशारा 

नवी दिल्ली  – पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ‘यास’ चक्रीवादळ (Cyclone Yaas) निर्माण झालं असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. येत्या २४ तासात चक्रीवादळ “यास” अत्यंत तीव्र चक्रीवादळात बदल होईल हे चक्रीवादळ हे ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार असून त्यामुळे या भागात मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाच्या धडकेनंतर प्रचंड नुकसान टाळण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यास चक्रीवादळाची (Cyclone Yaas) तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून १५५-१६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटाच्या दरम्यान असलेलं हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकत आहे आणि मंगळवारी या दोन राज्यांच्या किनारी धडकणार आहे. किनारी प्रदेशाकडे येताना ते अधिक भीषण होणार आहे हे वादळ  तौक्ते  पेक्षाही  भयंकर असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   

या बाबत एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले की चक्रीवादळ यासच्या (Cyclone Yaas) पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये आणखी १० एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.तर राज्यात एकूण ४५ टीम  तैनात आहेत.

बिहार-उत्तर प्रदेशात पावसाचा इशारा

येत्या २४ तासात चक्रीवादळ यास अत्यंत तीव्र चक्रीवादळात बदल होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यास बुधवारी बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचेल. चक्रीवादळाच्या धडकेनंतर प्रचंड नुकसान टाळण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर, चक्रीवादळाने प्रभावित सर्व राज्यांना गृह मंत्रालयाने आश्वासन दिले आहे की मंत्रालय त्यांना मदत करण्यासाठी २४ तास तयार असेल.  बंगाल आणि ओडिशा हे देशातील सर्वात मोठे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करणारे राज्य आहे. सर्व राज्यांना ऑक्सिजनचा बफर स्टॉक किमान दोन दिवस ठेवण्यास सांगितले गेले आहे.