सर्वात वर

DCGI ने दिली कोरोनाशी लढण्यासाठी एका नवीन औषधाला मंजुरी

नवी दिल्ली – संपूर्ण देशात कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर उद्रेक सुरु असतांना भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI ) कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी संयुक्तरित्या या औषधांची निर्मिती केली आहे.यामुळे कोवीड उपचारासाठी बराच फायदा होणार आहे.  

या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे. या औषधाच्या  क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या असून ज्या रुग्णांवर या औषधाची  चाचणी करण्यात आली त्यांच्या आरोग्य तातडीची सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. ज्या रुग्णांना ऑक्सीजन कमी होत त्या रुग्णांना जेव्हा हे औषध देण्यात आला तेव्हा त्यांची ऑक्सीजन ची गरज कमी झाली असे या चाचणीत दिसून आले आहे. ट्रायलमध्ये जे रूग्ण या चाचणीत सहभागी झाले होते ते इतर रूग्णांपेक्षा सुमारे तीन दिवस आधी बरे झाले असं दिसून आलं.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्यादेशात निर्माण झाली आहे.  यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी  2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. कारण  क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित  रुग्ण कमी वेळेत बरे  होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत.